शार्दुल, आदित्यचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टिकल लॉयर’मध्ये!

By admin | Published: April 25, 2016 04:54 AM2016-04-25T04:54:30+5:302016-04-25T04:54:30+5:30

विद्यार्थी शार्दूल कुलकर्णी (द्वितीय वर्ष) व आदित्य मनुबरवाला (तृतीय वर्ष) यांचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टिकल लॉयर, सुप्रीम कोर्ट केसेस पब्लिकेशन’ने आपल्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केला आहे.

Shardul, Aditya's research paper 'The Practical Loire'! | शार्दुल, आदित्यचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टिकल लॉयर’मध्ये!

शार्दुल, आदित्यचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टिकल लॉयर’मध्ये!

Next


मुंबई : प्रवीण गांधी विधि विद्यालयाचे दोन युवा विद्यार्थी शार्दूल कुलकर्णी (द्वितीय वर्ष) व आदित्य मनुबरवाला (तृतीय वर्ष) यांचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टिकल लॉयर, सुप्रीम कोर्ट केसेस पब्लिकेशन’ने आपल्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केला आहे.  विधि क्षेत्रात या प्रकाशनाला अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते; एवढेच नव्हेतर, यातील प्रकाशित साहित्याचे दाखले सर्वोच्च न्यायालयातही मानले जातात.
विशेष म्हणजे, या दोघा विद्यार्थ्यांचे विधि व न्यायविषयक काही लेख यापूर्वीच ‘लोकमत टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. कुष्ठपीडितांसंबंधीच्या विविध कायद्यांचे विधि आयोगाच्या २५६व्या अहवालाच्या अनुषंगाने परीक्षण करून आदित्य मनुबरवाला व शार्दूल कुलकर्णी यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. शिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळ
याबाबतच्या कायद्यामध्येही कुष्ठपीडितांना सापत्न वागणूक आहे. ते कायदे बदलणे तर दूरच,
त्यांचा साधा उल्लेखही आयोगाच्या अहवालात नसल्याचे शार्दूल व आदित्य यांनी आपल्या शोधनिबंधाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

>ब्रिटिश काळापासून वर्ष २0१६पर्यंतच्या विविध कायद्यांचा तौलनिक अभ्यास या शोधनिबंधात आहे.
स्पष्ट भेदभाव करणाऱ्या तीन वैधानिक तरतुदी रद्द करण्याबाबतची शिफारस विधि आयोगाने आपल्या अहवालात केलेली नाही, यावरही या विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे टीका केली आहे.

Web Title: Shardul, Aditya's research paper 'The Practical Loire'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.