शेगावात उसळला भक्तीसागर !

By admin | Published: February 19, 2017 02:17 AM2017-02-19T02:17:49+5:302017-02-19T02:17:49+5:30

‘श्रीं’ चा १३९ वा प्रकटदिन महोत्सव; १हजार ३५६ भजनी दिंड्याचा सहभाग.

Shakhata bhakatisagar bhakasagar! | शेगावात उसळला भक्तीसागर !

शेगावात उसळला भक्तीसागर !

Next

गजानन कलोरे
शेगाव, दि. १८- 'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १३९ वा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संतनगरी शेगावात भाविकांचा भक्तिसागर उसळला होता.
शनिवार माघ वद्य-सप्तमी अर्थात १८ फेब्रुवारी रोजी सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. हभप विष्णु महाराज कव्हळेकर यांचे सकाळी कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, विश्‍वस्त निळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, गोविंद कलोरे, अशोक देशमुख, पंकज शितूत, किशोर टांक आदि मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पुर्णाहूती संपन्न झाली. या उत्सवात २३ ते २९ फेब्रुवारी दरम्यान १ हजार ३५६ भजनी दिंड्यांचे आगमन झाले होते. यामध्ये २५८ नवीन तर ९९९ जुन्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या. भजनी दिंड्याची वारकरी संख्या ३१ हजारावर होती. संस्थानच्यावतीने २ लाखावर भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. नागपूर टिमकी श्रीभक्त मंडळाच्या वतीने वारकर्‍यांचे पादत्राणे विनामुल्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे. रविवार १९ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ८ दरम्यान हभप जगन्नाथ मस्के मुंबई यांचे काल्याचे किर्तन होऊन यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.
श्रींची भव्य नगर परिक्रमा
प्रकटदिनी श्रींच्या पालखीची दुपारी २ वाजता रथ, मेणा, गज अश्‍वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींची पालखी दत्तमंदिर, हरहर शिवमंदीर श्री शितलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर श्रींचे पकटस्थळ, श्री मारोती मंदीर बाजार विभाग, बसस्थानक व्यापारपेठ मार्गे श्रींची पालखी काढण्यात आली. शिवमंदीर, श्री प्रकटस्थळ, श्री मारोती मंदीर येथे विश्‍वतांच्या हस्ते पुजा करण्यात आली. लिप्ते, किशोर टांक यांच्या वतीने वारकर्‍यांना चहा व अभियांत्रिकी कर्मचारी विद्यार्थ्यांंच्या वतीने शरबत देण्यात आले. फुलवाले गोमासे यांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली.
 

Web Title: Shakhata bhakatisagar bhakasagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.