सीरियल रेपिस्टची नालासोपाऱ्यात दहशत; ‘त्या’ तरुणाच्या शोधात पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:09 AM2018-09-23T06:09:27+5:302018-09-23T06:09:53+5:30

 Serial rapist cavalcade; Police in search of 'that' young man | सीरियल रेपिस्टची नालासोपाऱ्यात दहशत; ‘त्या’ तरुणाच्या शोधात पोलीस

सीरियल रेपिस्टची नालासोपाऱ्यात दहशत; ‘त्या’ तरुणाच्या शोधात पोलीस

Next

नालासोपारा : ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा सीरियल रेपिस्ट नालासोपाºयात घुसला असून, त्याने एका बालिकेवर अत्याचार केला आहे, तर दुसरीवर अत्याचार करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आहे. नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाºयास २५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे. त्याच्यापासून सावध राहण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले आहे.
मुंबई आणि ठाण्यात अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा हा विकृत नालासोपारामध्ये वावरत असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह अनेक पथके स्थापन केली आहेत. मुलींनी दिलेल्या माहितीवरून त्याची रेखाचित्रे बनविण्यात आली आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांना जे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते, त्यातही हाच विकृत असल्याचे या पीडित मुलींनी ओळखले आहे. पोलिसांनी त्याची छायाचित्रे शहरातील विविध ठिकाणी लावली आहेत, तसेच पत्रके वाटून पालकांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. मुलींनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडे जाऊ नये, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सबबी सांगून कृत्ये

मुलींना गाठत तुला वडिलांनी बोलाविले आहे, तुझ्या वडिलांनी पत्र दिले आहे, अशा सबबी सांगून तो निर्जनस्थळी घेऊन जायचा. तेथे अंगावर किडा पडल्याचे सांगून कपडे काढायला सांगायचा आणि मग बलात्कार करायचा. चार दिवसांत त्याने दोन मुलींवर अत्याचार केले. मंगळवारी त्याने नालासोपाºयातील संखेश्वरनगरमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता, तर गुरुवारी एव्हरशाइननगर येथे लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.

Web Title:  Serial rapist cavalcade; Police in search of 'that' young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.