नि:स्वार्थी समाजसेवक, खासदार हरपला! चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत एकही गुन्हा दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:30 AM2018-01-31T06:30:11+5:302018-01-31T06:30:40+5:30

मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती.

 Selfless social worker, MP! In four decades of political career, no one has filed a criminal case | नि:स्वार्थी समाजसेवक, खासदार हरपला! चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत एकही गुन्हा दाखल नाही

नि:स्वार्थी समाजसेवक, खासदार हरपला! चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत एकही गुन्हा दाखल नाही

Next

विशेष प्रतिनिधी
पालघर : मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती. एकूण १४ लाखांच्या मालमत्तेतून २ लाखांचे कर्ज वजा केले तर कशीबशी १२ लाखांची मालमत्ता त्यांची आहे. लोकप्रतिनिधींचे पी.अ‍े. आणि साधे नगरसेवक करोडपती होण्याच्या काळात तीनदा खासदार व एकदा आमदार झालेल्या वनगांची ही आर्थिकस्थिती त्यांच्या नि:स्वार्थतेचे द्योतक आहे. पक्ष आणि समाज कार्यासाठी त्यांनी २००४ साली घेतलेली इंडिका कार ही एकमेव मोठी अशी मालमत्ता त्यांच्याकडे होती. परंतु ती इतकी जुनी होती की, तिचे काही मूल्येही उरलेले नाही.
आपल्या खासदारकीच्या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी भरलेल्या मालमत्तेच्या विवरण पत्रानुसार त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्टÑच्या तलासरी शाखेचे ६२३३२ रुपयांचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या तलासरी शाखेचे १२२३३२ असे एकूण १८४६६४ रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमीनीची किंमत ६ लाख होती. तर अकृषिक जमीनीची किंमत ३ लाख होती. पत्नीचे २ तोळ्याचे मंगळसूत्र हा एकमेव दागिना त्यांच्याकडे होता. त्याची किंमती ३० हजार रुपये होती. चार बँक खात्यातील शिल्लक अवघी ३२ हजार, राहते घर व गुंतवणूक हिशेबात घेतली तर त्यांची एकूण मालमत्ता १४ लाखांची त्यातून जर कर्जाची रक्कम वजा केली तर ती १२१५३३६ एवढीच होती. आजी-माजी मंत्री, पंतप्रधान, खासदार, आमदार हे शासकीय निवासस्थानाचे लाखो रुपयांचे भाडे व त्यातील सुविधांचे बिल थकविण्यात धन्यता मानत असतांना वनगा यांनी मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेचा एक छदामही बाकी ठेवलेला नव्हता. त्यामुळेच त्यांना नि:स्वार्थी व प्रामाणिक लोकप्रतिनीधी असे संबोधले जात होते.
२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी २२३२३४ मते मिळवून व १२,३५९ मतांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणूकीत काँग्रेसच्या दामू शिंगडा यांनी १६०५७० आणि मार्क्सवादी पक्षाचे लहानू कोम यांनी ९२२२४ मते मिळविली होती. त्यामुळे वनगा यांचा पराभव घडून आला होता. या पराभवाने खचून न जाता वनगा यांनी पक्ष बांधणी आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर आंदोलने उभारणे सुरु ठेवले. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी ५३३२०१ एवढी विक्रमी मते व २३९५२० मताधिक्यांनी बळीराम जाधव यांचा पराभव केला. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत वनगा यांनी भाजपचे उमेदवार म्हणून विक्रमगड मतदारसंघातून ४७३७१ मते मिळवून त्यांनी राष्टÑवादीचे चंद्रकांत भुसारा यांचा ५०३२ मताधिक्याने पराभव केला होता.

लोकसभेत चिंतामणी या टोपण नावाने ते ओळखले जायचे. पेशाने वकील असलेल्या वनगा यांनी आपल्या वकीलीकडे कधी व्यवसाय म्हणून न पाहता वकीली हे जनसेवेचे साधन म्हणून वापरले. असंख्य गोर-गरीब जनतेचे खटले त्यांनी मोफत चालविले.

आज बंदचे आवाहन

डहाणू : खा.चिंतामण वनगा यांच्या निधनाचे वृत्त पसरताच संपूर्ण पालघर जिल्हयात शोककळा पसरली आहे.तर संघर्षातुन साकारलेले नेतृत्व हरपल्याची प्रतिक्र ीया सर्वत्र उमटली. तलासरी बरोबरच डहाणू, पालघर, विक्रमगड, जव्हार या तालुक्यात शोक व्यक्त केला जात होता.

शेतीमध्ये राबणारे , भ्रष्टाचारमुक्त नेते म्हणून त्यांची ख्याती होती. पाकिस्तानच्या तुरुंगातील आदिवासी खलाशांची त्यांनी मुक्तता घडवून आणली होती. दुखवटा म्हणून डहाणू, चारोटी, कासा येथे बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन भाजपने केले आहे.

Web Title:  Selfless social worker, MP! In four decades of political career, no one has filed a criminal case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.