बंद चित्रपटगृहांना मिळणार संजीवनी - विजय पाटकर

By admin | Published: September 13, 2015 02:45 AM2015-09-13T02:45:42+5:302015-09-13T02:45:42+5:30

राज्यात विविध कारणांनी बंद पडलेल्या चित्रपटगृहांना संजीवनी देण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर

Sanjivani to get closed cinemas - Vijay Patkar | बंद चित्रपटगृहांना मिळणार संजीवनी - विजय पाटकर

बंद चित्रपटगृहांना मिळणार संजीवनी - विजय पाटकर

Next

नवी मुंबई : राज्यात विविध कारणांनी बंद पडलेल्या चित्रपटगृहांना संजीवनी देण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात ही माहिती दिली. या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी हेसुद्धा उपस्थित होते.
नवी मुंबई परिसरातील नाटक व चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने घणसोली येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात ४००पेक्षा अधिक चित्रपटगृहांना विविध कारणांमुळे घरघर लागली आहे. ही चित्रपटगृहे सुरू करण्याची महामंडळाची योजना असल्याचे पाटकर यांनी या वेळी स्पष्ट केले. यासंदर्भात थिएटर्स असोसिएशनसोबत बैठकसुद्धा झाली आहे. या बैठकीला अभिनेत्री अलका आठल्ये यांच्यासह नवी मुंबई, पनवेल व रायगड परिसरातून दिग्दर्शक, निर्माते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

तालमीसाठी हॉल देणार
नवी मुंबईत चित्रपट महामंडळ व नाट्य परिषदेला कार्यालयासाठी जागा देण्यात महापालिकेने असमर्थता दाखवली आहे. नवी मुंबईत अनेक संघटना असून, प्रत्येकाला कार्यालय पुरवणे शक्य नसल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी विजय पाटकर यांना सांगितले. मात्र दोनही संघटनांना सरावासाठी नाट्यगृहात हॉल उपलब्ध करून देण्यास महापौरांनी तयारी दाखवली असल्याचे पाटकर यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Sanjivani to get closed cinemas - Vijay Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.