सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ने तरुणाला बेदम चोपले

By admin | Published: October 27, 2016 04:48 AM2016-10-27T04:48:37+5:302016-10-27T04:48:37+5:30

वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरणारा अभिनेता सलमान खान, आता पुन्हा खासगी सुरक्षारक्षकाच्या कृत्यामुळे चर्चेत आला आहे. या सुरक्षारक्षकाने मंगळवारी मध्यरात्री

Salman's bodyguard stunned the young man | सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ने तरुणाला बेदम चोपले

सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ने तरुणाला बेदम चोपले

Next

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरणारा अभिनेता सलमान खान, आता पुन्हा खासगी सुरक्षारक्षकाच्या कृत्यामुळे चर्चेत आला आहे. या सुरक्षारक्षकाने मंगळवारी मध्यरात्री विलेपार्ले येथे परिचयातील एका तरुणाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. या प्रकरणी डी.एन.नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अख्तर कुरेशी (२५) हा दोन मित्रांसोबत आॅडी कारमधून जात असताना विलेपार्ले येथे सलमानचा खासगी सुरक्षारक्षक गुरमितसिंह शेरा याला रस्त्यात पाहिले. तेव्हा कुरेशी एका परिचित व्यक्तीशी मोबाइलवर बोलत होता. ओळख असल्याने शेराला पाहताच, कुरेशीने गाडी थांबविली आणि तो फोन शेराकडे दिला. फोनवर बोलताना शेराचा समोरच्या व्यक्तीशी वाद झाला आणि चिडून त्याने फोन कट केला. त्यानंतर, त्याने कुरेशीला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याचा कारचालक व अन्य दोन बॉडीगार्डनीही अख्तरला मारहाण केली. आपल्याकडील रिव्हॉल्वर दाखवून धमकी देत, तेथून ते निघून गेले. याबाबत अख्तरने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात शेरा व त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दिली. तथापि, शेरा याने मात्र, या घटनेचा इन्कार केला असून, आपण घटनास्थळी हजर नसल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)

शेरा गेल्या १८ वर्षांपासून सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करीत आहे. शेराचा मुलगा टायगर यालाही सलमानने चित्रपटात ब्रेक दिला होता. शेराला स्वत:ची सिक्युरिटी एजन्सीही उघडून दिली. त्याच्याकडून विविध सिलेब्रिटींना सुरक्षा पुरविण्याचे काम दिले जाते. सलमानच्या करिअरमधील सर्व चढउतारांचा तो जवळचा साक्षीदार आहे.


परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, मोबाइलचे कॉल डिटेल्स रेकॉर्डची पडताळणी केली जात आहे. याबाबत सत्यता पडताळून कारवाई केली जाईल.
- धनाजी नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी. एन. नगर पोलीस ठाणे

Web Title: Salman's bodyguard stunned the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.