पैशासाठी पतीनेच केली पत्नीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 05:24 PM2017-10-08T17:24:59+5:302017-10-08T17:35:19+5:30

Sales of wife made by husband on behalf of money | पैशासाठी पतीनेच केली पत्नीची विक्री

पैशासाठी पतीनेच केली पत्नीची विक्री

ठळक मुद्देस्वत:च्या पत्नीचा परपुरुषाबरोबर बळजबरीने विवाह दीड लाख रुपये घेऊन पत्नीची विक्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : स्वत:च्या पत्नीचा परपुरुषाबरोबर विवाह लावून त्याबदल्यात सुमारे दीड लाख रुपये घेऊन पत्नीची विक्री केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधित वराला वधू ही आपली पत्नी असल्याचे लपवून ठेवत बळजबरीने विवाह लावून दिला. या कृत्यास पती अमोल भालेराव याची आई, बहीण व तिच्या मित्रांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगरमधील महिलेचे अमोल भालेराव याच्यासोबत विवाह झालेला होता़ मात्र, कोणताही कामधंदा न करणाºया भालेराव यास पत्नीने अनेकदा कामाबाबत सूचनाही केली़ पती अमोल भालेराव हा पत्नीस सुरतहून म्हैसाना येथे घेऊन गेला. तिथे तिची सासू ललिता भालेराव, नणंद मयूरी हरीश उघाडेसह मयुरीचा मित्र नितीन सारवान, मेघा सोलंकी व गोपाळ सोलंकी, प्रिया व तिचा नवरा नागेश हे सर्व भेटले. यानंतर ते राजस्थानमधील पाली येथील जैन भवनात गेले़

पाली येथील जैन भवनमध्ये विशाल जैन व त्यांच्या कुटुंबीयांना अमोल भालेराव याने पत्नीला विवाहासाठी दाखविण्याचा कार्यक्रम केला़ यावेळी सासूने मावशी, पतीने भाऊ व नणंद मयूरी हिने बहीण असल्याचे विशाल जैन यांना सांगून दुसºया दिवशी त्यांच्याशी विवाह लावून दिला़ विवाहानंतर अमोल भालेरावच्या पत्नीने जैन यांना आपले लग्न झालेले असल्याचे सांगताच जैन याने अमोल भालेराव यास एक लाख ६० हजार रुपये दिले असल्याचे सांगितले़ यानंतर जैन यांनी मनमाड येथील विवाहितेच्या वडिलांशी संपर्क साधला़

व्यावसायिक अडचणीमुळे जैन यांनी विवाहितेस नाशिकला सोडू शकत नसल्याचे सांगितले़ त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच जैन यांना कोतवाली पोलीस ठाण्यात बोलावले असता त्याठिकाणी विवाहितेचा भाऊ राष्ट्रपाल पगारे व धम्मरत्न पाटील हे नाशिक पोलिसांसह दाखल झाले होते़ यानंतर विवाहितेस नाशिकला आणले असता तिने पती अमोल, सासू ललिता, नणंद मयूरी व तिचे मित्र याविरोधात विक्री केल्याची फिर्याद दिली़.

Web Title: Sales of wife made by husband on behalf of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.