दारूमुक्तीसाठी ग्रामीण पोलिसांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 04:29 PM2017-05-08T16:29:17+5:302017-05-08T16:29:17+5:30

हायवेवर असलेले सर्वच बीअर बार बंद झाले. संपूर्ण तालुक्यात केवळ 3 बीअर बार सुरू आहेत

Rural Police Complaint For Drug Abuse | दारूमुक्तीसाठी ग्रामीण पोलिसांची धडपड

दारूमुक्तीसाठी ग्रामीण पोलिसांची धडपड

googlenewsNext

श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 8 - तालुक्यातील हायवेवर असलेले सर्वच बीअर बार बंद झाले. संपूर्ण तालुक्यात केवळ 3 बीअर बार सुरू आहेत. बारवर तोबा गर्दी होत आहे. यामुळे चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरू आहे. पण ही अवैध दारू विक्री रोखून सिल्लोड तालुका दारूमुक्त करण्याचा संकल्प सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी केला आहे. यामुळे तळीरामांची पंचायत होताना दिसत आहे. हॉटेल, ढाबे यावर मनसोक्त दारू पिणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तळीरामांमध्ये घबराट पसरली आहे.

सिल्लोड तालुक्यात दारू मुक्तीसाठी ग्रामीण पोलीस धडपड करीत असले तरी तळीराम याला किती प्रतिसाद देतात हे महत्वाचे ठरणार आहे. त्यांनी ठरवले तर हे शक्य आहे. नाही तर ते तळीराम कुठूनही कुणालाही चकवा देऊन चपटी मिळवतातच हे विसरून चालणार नाही. यासाठी सर्वानीच विडा उचलण्याची गरज आहे.  कधी नव्हे हे पाऊल पोलिसांनी उचलले आहे. त्यांना मदत करण्याची खरी गरज आहे. समाजाला लागलेली दारू व्यसनाची कीड नष्ट करून दारूमुक्त गाव करून युवकांच्या आयुष्याच्या नवीन सूर्योदय करण्याचा संकल्प सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांनी केला असला तरी जोपर्यंत तळीराम दारू पिणे सोडत नाही तोपर्यंत दारू बंद करणे शक्य नाही.

पण पोलिसांची धडपड बघून व्यसनापाई त्रस्त असलेल्या महिलांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. पण खरच ही दारू बंद होईल का, गाव दारूमुक्त झाले तरी घर धनी दारू सोडेल का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. सत्य कटू असते. ते सहजा सहजी पचवता येत नाही.

Web Title: Rural Police Complaint For Drug Abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.