पार्थ आणि रोहित लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 08:38 PM2019-02-19T20:38:53+5:302019-02-19T20:51:24+5:30

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पवारांकडून पूर्णविराम

rohit and parth pawar will not contest lok sabha election says ncp chief sharad pawar | पार्थ आणि रोहित लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत- शरद पवार

पार्थ आणि रोहित लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत- शरद पवार

googlenewsNext

मुंबई: पार्थ आणि रोहित पवार निवडणूक लढवणार नाहीत, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ आणि रोहित पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. या चर्चेला शरद पवार यांनी अखेर पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे पक्षानं संधी दिल्यास मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं विधान अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी कालच केलं होतं. 

पार्थ अजित पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय झाले आहेत. पक्षानं आदेश दिल्यास मावळमधून लोकसभा निवडणुकीला उभे राहू, असं त्यांनी कालच म्हटलं होतं. मावळ मतदारसंघाचा भाग असलेला पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात अजित पवारांना मोठं पाठबळ आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकला असता. त्यामुळे पार्थ राजकीय आखाड्यात उतरणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र शरद पवार यांनी पार्थ निवडणूक लढवणार नसल्याचं आज जाहीर केलं. 

आपल्याला राज्यापेक्षा केंद्रातील राजकारणात जास्त रस आहे, असं पार्थ कालच म्हणाले होते. केंद्रात गेल्यास राष्ट्रीय मुद्द्यांवर काम करण्यासाठी मोठा परिघ उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटलं होतं. जर पक्षानं यंदाच्या निवडणुकीसाठी इतर दुसऱ्या कार्यकर्त्याला मावळमधून उमेदवारी दिल्यास २०२४ च्या निवडणुकीपर्यंत थांबण्याची माझी तयारी आहे. त्यावेळी वयही माझ्या बाजूने असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार हेदेखील गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करताना रोहित यांनी त्यांची भेट घेतली होती. सध्या त्यांच्याकडे इंडियन शुगर असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.  
 

Web Title: rohit and parth pawar will not contest lok sabha election says ncp chief sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.