VIDEO- हर्णे बंदरात आढळला दुर्मिळ ऑक्टोपस 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 11:32 AM2017-12-25T11:32:33+5:302017-12-25T13:40:12+5:30

 दापोली तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही भर पडली आहे.

Rare octopus found in Harne harbor | VIDEO- हर्णे बंदरात आढळला दुर्मिळ ऑक्टोपस 

VIDEO- हर्णे बंदरात आढळला दुर्मिळ ऑक्टोपस 

Next

- शिवाजी गोरे

रत्नागिरी- दापोली तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही भर पडली आहे. तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी ऑक्टोपसचे दर्शन सोमवारी सकाळी स्थानिक लोकांना घडले. हर्णे समुद्र  समुद्रकिनारी ऑक्टोपस गेल्यावर्षी आढळला होता. हर्णे समुद्रकिनारा मुळातच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे सापडतात आणि त्यामुळेच हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाले आहे. आता येथे अॉक्टोपस सापडल्याने हा किनारा पुन्हा चर्चेत आला आहे

कोकण किनाऱ्यावर फार न आढळणारा ऑक्टोपस हा समुद्री जीव असून, ती समुद्र तळाशी राहणारी प्रजाती आहे. याला मराठीमध्ये अष्टपाद असे म्हणतात. आठ बाहू असणारा ऑक्टोपस हा जलचर प्राणी आहे. ऑक्टोपस वंशामध्ये एकूण लहान मोठ्या 50 जाती आहेत. त्यामुध्ये लहानात लहान 2.50 सेमी तर मोठ्यात मोठी 9.7  मीटरची प्रजाती आढळते. हा प्राणी विशेषत: खोल समुद्रात राहत असला तरी तो उथळ भागामध्येही राहू शकतो. स्वसंरक्षण करण्यासाठी ऑक्टोपस शाईसारखा एक द्रव बाहेर टाकत असतो. त्याच्या शरीराची रचना गोलाकार, फुगवटा  असलेली  असते. त्याला डोळे आणि आठ प्रकारचे लांब हात असतात. हा जगातील महासागरामध्ये रहात असून, विशेषतः उबदार आणि उष्ण कटीबंध भागामध्ये राहतो. याला खोल समुद्रातील राक्षसही म्हटले जाते. 

ऑक्टोपसचे एरवी चित्रपट आणि संग्रालय यामध्येच दर्शन घडते. हर्णे  समुद्रकिनारी डॉल्फीन माशांचे अधुमधून दर्शन घडत असते. त्यामुळे येथील समुद्रकिनार्‍याला पर्यटकांची अधिक पसंती आहे.

Web Title: Rare octopus found in Harne harbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.