पतंजलीच्या यशामागे रामदेव बाबांचा छोटा भाऊ

By admin | Published: May 6, 2016 05:39 PM2016-05-06T17:39:45+5:302016-05-06T17:39:45+5:30

पतंजलीच्या या यशामागे खरा चेहरा आहे तो रामदेव बाबांचे बंधू राम भरत यांचा

Ramdev Baba's younger brother, after the success of Patanjali | पतंजलीच्या यशामागे रामदेव बाबांचा छोटा भाऊ

पतंजलीच्या यशामागे रामदेव बाबांचा छोटा भाऊ

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6- रामदेव बाबांचा पतंजली ग्रुप दिवसेंदिवस विस्तारत चालला आहे. अनेक खाद्यपदार्थांच्या उत्पादनासह पतंजलीनं आयुर्वेदिक औषधंही बनवण्यास सुरुवात केली आहे. पतंजलीची बिस्किटे आणि खाद्यपदार्थ लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरता आहेत. 
मात्र पतंजलीच्या या यशामागे खरा चेहरा आहे तो रामदेव बाबांचे बंधू राम भरत यांचा. अत्यंत साधं राहणीमान असलेल्या रामदेव बाबांचे छोटे बंधू राम भरत यांच्यामुळेच पतंजली आयुर्वेदनं यश गाठलं आहे. हरिद्वारमधल्या पतंजली उत्पादन कंपनीचे सीईओ असल्याचा मान त्यांना मिळत आहे. रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण हे पतंजली ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 
मात्र पतंजली आयुर्वेदिक ख-या अर्थानं रामदेवबाबांचे 38 वर्षीय बंधू भरत यांनी नावीन्यपूर्ण कल्पनांनी  प्रगती करून पतंजली आयुर्वेदाला नावारुपाला आणलं आहे. भरत यांना पतंजली ग्रुपचे फायनान्स, ह्युमन रिसोर्स, प्रॉडक्शन आणि सप्लाय चेनचे प्रतिनिधी रिपोर्ट करतात. मात्र भरत हे रामदेव आणि बालकृष्ण यांना सगळा अहवाल देतात. राम भरत हे साध्या नोकराप्रमाणे काम करत असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच कंपनी दिवसेंदिवस प्रगतिपथावर जात असल्याची माहिती आता समोर येते आहे. 
 

Web Title: Ramdev Baba's younger brother, after the success of Patanjali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.