परतीच्या पावसाचा दणका, खान्देशात मुसळधार : पुण्यात ढगफुटी, गोदावरीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:39 AM2017-10-12T03:39:27+5:302017-10-12T04:16:32+5:30

राज्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्याला फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबादला पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

 Rainfall of rains, floods in Khandesh: cloudburst in Pune, floods in Godavari | परतीच्या पावसाचा दणका, खान्देशात मुसळधार : पुण्यात ढगफुटी, गोदावरीला पूर

परतीच्या पावसाचा दणका, खान्देशात मुसळधार : पुण्यात ढगफुटी, गोदावरीला पूर

मुंबई : राज्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने बुधवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात दाणादाण उडविली. वीज पडून यवतमाळमध्ये एक विद्यार्थिनी तर जगळगावला मेंढपाळाचा मृत्यू झाला. बीडमध्ये पुरात वाहून जाणा-या दोन शाळकरी मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुले बेपत्ता आहेत. उस्मानाबादमध्ये शेतकरी वाहून गेला. सोलापूरमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. बीड व उस्मानाबादेत अतिवृष्टी झाली व पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने मराठवाड्याला फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबादला पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला तर नाशिकला धो धो कोसळणा-या पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे.
बीड जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळी तालुक्यातील नागापूर महसूल मंडळात सर्वाधिक १५५ मि.मी. पावसाची नोंद झाली. उस्मानाबादेत चार मंडळांत अतिवृष्टी झाली. पश्चिम वºहाडात दमदार पाऊस झाला. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे.
खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. धुळे तालुक्यात अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला. पांझरा, बुराई नद्यांना पूर आला आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. मंचरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन वाहून गेली. भोर तालुक्यातील भुंगवली गावात ढगफुटी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोलापूरमध्ये पाऊस झाला. नाशिकमध्ये नद्या-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर तसेच दारणा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. पावसाने द्राक्ष, कांदा तसेच तूर, सोयाबीन, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
तिलारी धरण भरले-
महाराष्ट्र आणि गोवा सरकारने संयुक्तरीत्या उभारलेले आणि या दोन्ही राज्यांच्या सीमेलगत असलेले तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण भरल्यामुळे गोमंतकीयांसमोरील पाण्याचा प्रश्न दूर होण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात झाला ढगफुटीसारखा पाऊस-
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला.
भीमा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. नाशिकला सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात ३६ तासांत ५३६ मिमी पाऊस झाला. गोदावरी, दारणा नद्यांना पूर आला आहे.

Web Title:  Rainfall of rains, floods in Khandesh: cloudburst in Pune, floods in Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.