नांदेड महापालिकेत काँग्रेसला अभूतपूर्व यश, राहुल गांधींनी केलं कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:48 AM2017-10-14T04:48:40+5:302017-10-14T04:48:59+5:30

नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या अभूतपूर्व यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन केले. नांदेड महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष

 Rahul Gandhi praised Congress for unprecedented success in Nanded Municipal Corporation | नांदेड महापालिकेत काँग्रेसला अभूतपूर्व यश, राहुल गांधींनी केलं कौतुक

नांदेड महापालिकेत काँग्रेसला अभूतपूर्व यश, राहुल गांधींनी केलं कौतुक

Next

मुंबई : नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या अभूतपूर्व यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन केले.
नांदेड महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेृत्वाखाली काँग्रेसने ८१ पैकी ७३ जागी अक्षरश: एकतर्फी विजय मिळवित भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादीला चांगलीच धोबीपछाड दिली.
या निवडणुकीत भाजपाने काँग्रेससला तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांना केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनाही एका जागेवर थांबली, तर राष्ट्रवादी आणि एमआयएमला खातेही उघडता आले नाही. नांदेडच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
नांदेडातून सुरु झालेला हा विजयाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल आणि आगामी निवडणुकांतही काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी टिष्ट्वट करून या अभूतपूर्व विजयाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Web Title:  Rahul Gandhi praised Congress for unprecedented success in Nanded Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.