पुण्यातल्या 'या' चहावाल्याची कमाई  IAS अधिका-यापेक्षाही जास्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 11:26 AM2018-03-04T11:26:54+5:302018-03-04T11:53:15+5:30

2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून देशभरात 'चायवाला' हा शब्द चांगलाच गाजतोय. पुण्यातील एक चहावाला देखील सध्या चर्चेत आहे. त्याच्या महिन्याभराच्या कमाईमुळे हा चहावाला चर्चेत आहे.

Pune Tea seller sets benchmark by making Rs. 12 lakh per month | पुण्यातल्या 'या' चहावाल्याची कमाई  IAS अधिका-यापेक्षाही जास्त 

पुण्यातल्या 'या' चहावाल्याची कमाई  IAS अधिका-यापेक्षाही जास्त 

googlenewsNext

पुणे : 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून देशभरात 'चायवाला' हा शब्द चांगलाच गाजतोय. पुण्यातील एक चहावाला देखील सध्या चर्चेत आहे. त्याच्या महिन्याभराच्या कमाईमुळे हा चहावाला चर्चेत आहे. या चहाविक्रेत्याची कमाई ऐकून-वाचून तुम्हीही थक्क व्हाल. कारण हा चहाविक्रेता महिन्याला तब्बल 12 लाख रुपये कमावतो.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नवनाथ येवले नावाचा हा व्यक्ती चहा विकून महिन्याभरात 12 लाख रूपयांची कमाई करतो. 'येवले टी हाऊस' हे ठिकाण पुण्यातील काही प्रसिद्ध चहा स्टॉल्सपैकी एक आहे. पुण्यामध्ये  'येवले टी हाऊस' चे तीन सेंटर असून प्रत्येक सेंटरवर जवळपास 12 लोकं काम करतात अशी माहिती आहे. मिळवलेल्या या यशामुळे नवनाथ येवले उत्साहीत आहेत, भविष्यात या चहाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करायची इच्छा असल्याचं येवले म्हणाले.  

Web Title: Pune Tea seller sets benchmark by making Rs. 12 lakh per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे