अश्लील चाळे; रिक्षाचालक अटकेत

By admin | Published: November 3, 2016 05:26 AM2016-11-03T05:26:52+5:302016-11-03T05:26:52+5:30

सतरा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील चाळे करून दाखवल्याप्रकरणी निर्मल नगर पोलीसांनी ॠषीकेश मौर्या (२८) या रिक्षाचालकाला मंगळवारी अटक केली.

Pornographic activities; Suspended rickshaw puller | अश्लील चाळे; रिक्षाचालक अटकेत

अश्लील चाळे; रिक्षाचालक अटकेत

Next


मुंबई : सतरा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील चाळे करून दाखवल्याप्रकरणी निर्मल नगर पोलीसांनी ॠषीकेश मौर्या (२८) या रिक्षाचालकाला मंगळवारी अटक केली.
खेरवाडी जंक्शन परिसरात रिक्षाचालक वास्तव्यास असून, वांद्रे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला त्याने अश्लील चाळे करून दाखवले. यावेळी मुलीने त्याचा फोटो काढत निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तेव्हापासून मौर्य फरार होतो. मात्र पोलीस त्याच्या मागावर असतानाच वांद्रे परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. रिक्षाचालकाने त्याचा गुन्हा कबुल केला असून, त्याने यापूर्वीही असे कृत्य केल्याचा संशय पोलीसांना आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Pornographic activities; Suspended rickshaw puller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.