राजकारणाचं गुन्हेगारीकरण संपलं पाहिजे - विखे-पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 08:18 PM2018-07-12T20:18:10+5:302018-07-13T01:07:28+5:30

विधान परिषद व विधानसभेत वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा नागपुरात मोठ्या थाटात संपन्न झाला आहे.

Politics should end criminalization - Vikhe-Patil | राजकारणाचं गुन्हेगारीकरण संपलं पाहिजे - विखे-पाटील 

राजकारणाचं गुन्हेगारीकरण संपलं पाहिजे - विखे-पाटील 

googlenewsNext

नागपूर- विधान परिषद व विधानसभेत वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा नागपुरात मोठ्या थाटात संपन्न होत आहे. कार्यक्रमाची रंगत वाढवणारा 'लोकमत की अदालत' हा कार्यक्रम ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्या संचालनात सुरू करण्यात आला.

निवडणुका जवळ आल्या की उड्या मारण्याचा खेळ सुरू होते. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समाजकंटकही येतात. जनतेच्या असा आरोप आहे की पक्षवाढीच्या नादात आपण येईल त्याचे निर्माल्य करतात. त्याने पक्षाची सूज वाढते ताकद नाही, असा प्रश्न अॅड. उज्ज्वल निकम यांनी विचारला. त्याला विधानसभेते विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांनीही उत्तर दिलं आहे. दोन-तीन वर्षांत पाहिलं की ब-या लोकांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे मान्य करतो राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे संपलं पाहिजे. सगळ्या पक्षांनी आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, असं विखे-पाटील म्हणाले आहेत.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. सरपंच पदापासून संसदेपर्यंत उत्तम कामगिरी करणा-या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याची प्रथा ‘लोकमत’ने सुरू केली आहे. या मालिकेतील विधिमंडळ पुरस्काराचे हे दुसरे पुष्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आमदारांचा सन्मान केला जाणार आहे.

सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या वर्षी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
   

Web Title: Politics should end criminalization - Vikhe-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.