राजकीय नेत्यांनी हडपले भूसंपादनाचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:36 AM2018-05-02T05:36:18+5:302018-05-02T05:36:18+5:30

रेल्वे भूसंपादनात मिळालेले पैसे हडपल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन राजकीय पदाधिकाऱ्यांसह इतर एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यात काँग्रेसचा जिल्हा सचिव विलास मुके

Political leaders grabbed land acquisition money | राजकीय नेत्यांनी हडपले भूसंपादनाचे पैसे

राजकीय नेत्यांनी हडपले भूसंपादनाचे पैसे

Next

कळंब : रेल्वे भूसंपादनात मिळालेले पैसे हडपल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन राजकीय पदाधिकाऱ्यांसह इतर एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यात काँग्रेसचा जिल्हा सचिव विलास मुके, राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी शहर अध्यक्ष अजय गोसावी कारमोरे आणि संदीप गोसावी कारमोरे यांचा समावेश आहे. याप्रकरणी तालुक्यातील तिरझडा येथील गणेश गोसावी नेहारे यांनी तक्रार दिली होती.
तिरझडा येथील रहिवासी राधाबाई नेहारे यांच्या मालकीचे चापर्डा शिवरात शेत आहे. सदरचे शेत रेल्वेने भूसंपादित केले. त्यापोटी त्यांना २७ लाख ८७ हजार २८५ रुपये मिळणार होते. ही रक्कम आपण काढून वारसांमध्ये वाटप करुन देतो, अशी बतावणी या तिघांनी केली. यासाठी त्यांनी फिर्यादी गणेश नेहारे व राधाबाई नेहारे यांना विश्वासात घेतले.विलास मुके यांनी मी रेल्वे अधिकारी असल्याची बतावणी करुन म्हाताºया व अज्ञानी राधाबाईचा विश्वास संपादन केला. नंतर राधाबाईच्या अज्ञानाचा लाभ घेऊन त्यांच्याकडून सही व आंगठा असणारे १४ कोरे धनादेश घेतले.
या तिघांनी स्वत: व इतरांच्या खात्यात राधाबाईच्या खात्यातून १८ लाख ३४ हजार वळते केले. यासंबधी विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेवटी पीडित कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Web Title: Political leaders grabbed land acquisition money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.