लष्करी अधिका-याचा खून, पदपथावर राहत असल्याची पोलिसांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 03:30 AM2018-02-03T03:30:00+5:302018-02-03T03:30:14+5:30

लष्कर येथील पदपथावर झोपडी करून राहणा-या एका कॅप्टन दर्जाच्या निवृत्त लष्करी अधिका-याचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. १) मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी घडली.

 Police information about the murder of a military officer, lies on the footpath | लष्करी अधिका-याचा खून, पदपथावर राहत असल्याची पोलिसांची माहिती

लष्करी अधिका-याचा खून, पदपथावर राहत असल्याची पोलिसांची माहिती

Next

पुणे  - लष्कर येथील पदपथावर झोपडी करून राहणा-या एका कॅप्टन दर्जाच्या निवृत्त लष्करी अधिका-याचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून झाल्याची घटना गुरुवारी (दि. १) मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी घडली. याप्रकरणी दोघा अज्ञात व्यक्तींविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅप्टन रवींद्रकुमार बाली (वय अंदाजे ६७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. बाली यांच्या पुतण्याशी पोलिसांनी संपर्क साधला असता, त्यांनी छायाचित्रावरून बाली यांना ओळखले आहे.
सागर वाघमारे (वय २५, रा. क्वीन्स गार्डन) यांनी फिर्याद दिली आहे. सदर्न कमांड आॅफिसर्स मेसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील पदपथावर ही घटना घडली. वाघमारे पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्या क्लब ईस्टर्न इंडिया डॉ. कोयाजी रस्ता येथे रात्रपाळीवर होते. बाली हे पदपथावर आडोसा करून एका तंबूमध्ये राहत होते. त्यांच्याजवळ कोणत्याच मौल्यवान वस्तू नव्हत्या. यामुळे त्यांच्या खुनाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत माहिती देताना महिला पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस. के. यादव म्हणाल्या, बाली ज्या पदपथावर राहत होते, त्यांच्या समोरच्या बंगल्यातील काही व्यक्तींना मध्यरात्री पदपथावर वादावादीचा आवाज आला. या वेळी एक व्यक्ती बाली यांना मारहाण करीत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर बाली हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याजवळ ओळखीचा असा कोणताच पुरावा सापडला नाही.
संबंधित परिसरात त्यांच्या ओळखीच्या असलेल्या व्यक्तींकडून त्यांची माहिती मिळाली. त्यांच्या एका पुतण्याने मृत व्यक्ती बालीच असल्याचे छायाचित्रावरून ओळखले आहे. तूर्तास त्यांची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांना ओळखणाºया व्यक्तींनी पोलिसांशी संपर्क साधावा. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी लष्कर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे यादव यांनी सांगितले.

बाली आणि त्यांचा प्रवास....

रवींद्रकुमार बाली हे एनडीएमधून पास आऊट झाल्यानंतर लष्करात कॅप्टन म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. त्यांच्याबाबत यापूर्वी इंग्रजी दैनिकांत माहिती प्रसिद्ध झाली होती. आई-वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने, तसेच त्यांच्याकडे लक्ष देण्यास कोणीच नसल्याने त्यांनी लष्करातून निवृत्ती पत्करली. काही वर्षांतच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. यातच लष्करातील नियमाप्रमाणे त्यांची सेवा झाली नसल्याने त्यांना निवृत्ती योजना लागू झाली नाही.
घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. मात्र सावत्र भावांबरोबर त्यांचे संपत्तीवरून वाद सुरू झाले. त्याला कंटाळून ते संपत्ती सोडून पुण्यातील एका बीपीओ कंपनीत रुजू झाले. मात्र ती बीपीओ कंपनी काही वर्षांतच बंद पडली. यामुळे कर्ज काढून कल्याणीनगर परिसरात त्यांनी घेतलेली सदनिका हप्ते न भरल्याने बँकेने जप्त केली. नोकरीसाठी कधी गोवा तर कधी केरळ असा त्यांचा प्रवास सुरू होता.
दरम्यान, केरळमध्ये असताना जोरदार पावसामध्ये सायकल आणि जवळील सर्व कागदपत्रे वाहून गेली. त्यानंतर ते पुन्हा पुण्यात दाखल झाले. येथे ते रस्त्याच्या कडेला आडोसा करून राहत होते.
त्यांची इंग्रजीवर पकड असल्याने परिसरातील काही व्यक्तींशी त्यांचा चांगला परिचय होता. त्यांच्याकडून बाली यांना खायला, तसेच आंघोळीला पाणीही मिळत होते.

Web Title:  Police information about the murder of a military officer, lies on the footpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.