पीएनबी घोटाळा : केवळ ठेविदार बदलले, परिस्थिती नाही, राज ठाकरेंचा नरेंद्र मोदी, जेटलींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 10:26 PM2018-02-18T22:26:40+5:302018-02-18T22:27:28+5:30

हिरे व्यावसायिक निरज मोदी  पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे.

PNB scam: Only the contractors changed, no situation, Raj Thackeray's Narendra Modi, Jaitley | पीएनबी घोटाळा : केवळ ठेविदार बदलले, परिस्थिती नाही, राज ठाकरेंचा नरेंद्र मोदी, जेटलींना टोला

पीएनबी घोटाळा : केवळ ठेविदार बदलले, परिस्थिती नाही, राज ठाकरेंचा नरेंद्र मोदी, जेटलींना टोला

googlenewsNext

मुंबई -  हिरे व्यावसायिक निरज मोदी  पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. रविवारी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात  राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी आपण देशाचे चौकीदार असल्याचा भाषणांमधून केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून मोदींवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रामध्ये विजय माल्ल्या, निरज मोदी यांच्यासारखे घोटाळेबाज बँका लुटून पळताना दिसत आहेत, तर स्वत:ला चौकीदार समजणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अरुण जेटली  गाढ झोपलेले दिसत आहे. तर सर्वसामान्य ठेविदार चिंतेत आहेत. 



याआधी जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. संघाची लष्कराशी तुलना म्हणजे भागवत यांनी थंडीच्या दिवसांमध्ये पाहिलेले उबदार स्वप्न असून,  भागवत आणि संघ स्वयंसेवकांना नियंत्रण रेषेवर पाठवले तर त्यांच्याकडील दंडुका आणि बौद्धिक घेणारी पुस्तके पाहून पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी पसार होतील, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला आहे. 
त्याआधीच्या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांचा समाचार घेतला होता. या व्यंगचित्रात अहो, कधी तरी आमच्याही छकुल्याचं कौतुक करा ना, असा मोदी मनमोहन सिंगांना सांगताना दाखवण्यात आले होते. त्यावर मनमोहन सिंगांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजी, नक्की केले असते पण त्यात नुसताच पेंढा भरलाय, असं उत्तर मनमोहन सिंग यांनी दिलं आहे. व्यंगचित्रातून मोदी हातातून बाबागाडी घेऊन जात असताना पेंढ्याच्या स्वरूपात एक प्रतीकात्मक बाहुलं दाखवण्यात आलं आहे. त्या पेंढ्यानं भरलेल्या योजनारूपी बाहुल्याला जाहिरातबाजीचं विशेषण लावण्यात आलं आहे. तर मोदींच्या मागे अमित शाह खेळणी घेऊन चालताना दाखवण्यात आले आहेत.

Web Title: PNB scam: Only the contractors changed, no situation, Raj Thackeray's Narendra Modi, Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.