पीयूष गोयल यांनी चर्चेला बोलवावं, आंदोलन मागे घेऊ- संदीप देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 09:18 AM2018-03-20T09:18:44+5:302018-03-20T09:18:44+5:30

मध्य रेल्वेच्या दादर-माटुंग्या या स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसेची उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.

Piyush Goyalan should talk to the discussion and take back the movement - Sandeep Deshpande | पीयूष गोयल यांनी चर्चेला बोलवावं, आंदोलन मागे घेऊ- संदीप देशपांडे

पीयूष गोयल यांनी चर्चेला बोलवावं, आंदोलन मागे घेऊ- संदीप देशपांडे

Next

मुंबई- मध्य रेल्वेच्या दादर-माटुंग्या या स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसेची उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चासुद्धा केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांना चर्चेला बोलावावं, आम्ही आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतला आहे.  विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या आहेत. परंतु या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांवर हे आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच आली आहे.

आधी रेल्वे अप्रेटिंसच्या विद्यार्थ्यांना थेट रेल्वेत सामावून घेतलं जात होतं, पण आता त्यासाठी रेल्वे प्रशासनानं 20 टक्क्यांच्या कोटा आरक्षित केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेण्यासाठी लेखी परीक्षाही अनिवार्य केली आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जात असल्याचा या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रेल्वे प्रशासनानं मान्य न केल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे यात अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे.

Web Title: Piyush Goyalan should talk to the discussion and take back the movement - Sandeep Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.