नियतीला हरवून त्याने मिळवले 'सुयश'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 08:04 AM2018-10-18T08:04:59+5:302018-10-18T08:04:59+5:30

आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे सुरु असताना नकळत्या वयात झालेल्या अपघातातून बाहेर पडून सातासमुद्रापार भारताचे नाव मोठे करणाऱ्या सुयश जाधवची ही गोष्ट.

physically disable Suyash Jadhav scored gold medal | नियतीला हरवून त्याने मिळवले 'सुयश'

नियतीला हरवून त्याने मिळवले 'सुयश'

Next

पुणे : आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे सुरु असताना नकळत्या वयात झालेल्या अपघातातून बाहेर पडून सातासमुद्रापार भारताचे नाव मोठे करणाऱ्या सुयश जाधवची ही गोष्ट. परवा जकार्ता येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्स २०१८स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले.पण फक्त खेळफक्त खेळाडू म्हणूनचं नाही तर नियतीला हरवून जिंकणारा लढवैय्या म्हणून त्याचे नाव घ्यायला हवे. 

               सुयश मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूरचा. सहावीला असताना भावाच्या लग्नात खेळताना सुयशच्या हातात असलेल्या खेळण्याचा विजेच्या प्रवाहाला स्पर्श झाला आणि काही क्षणात त्याने त्याचे दोनही अपघातात गमावले. काही काळ त्या अपघातामुळे त्याच्या आयुष्यात अंधार पसरलाही होता. पण त्यातून घरच्यांच्या इच्छाशक्तीच्या आणि आंतरिक उर्मीच्या जोरावर त्याने मात केली आणि नवा अध्याय रचला. त्याला खरं तर लहानपणापासून जलतरणाची आवड. त्याने वडील नारायण यांनी त्याला वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून पोहायला शिकवले.इतर मुलांच्या तुलनेत याचा पोहण्याचा वेग बघून क्रीडा शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांना मुलाचे पाय पाळण्यात दिसत होते. अनेक जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये तो बक्षिसं मिळवत होता. अचानक अपघात झाला आणि जणू त्याच्या वाहत्या करिअरला खीळ बसली. पण त्याही परिस्थितीत कुटुंबीयांनी त्याला काहीही विशेष जाणवू दिल नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याला वाढवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा सराव सुरु ठेवला. इयत्ता ९वीत असताना त्याने पहिले राष्ट्रीय पदक मिळवले आणि त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही. आज त्याने विविध गटात सुमारे १०५ पदकांवर नाव कोरले आहे. एकदा तर अंगात १०४ डिग्री ताप असताना तो टॅंकमध्ये उतरला आणि जिंकला सुद्धा !  

            या सर्व प्रवासाबद्दल तो म्हणतो, 'खेळात असो किंवा आयुष्यात सातत्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता. प्रत्यक्ष खेळात फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक क्षमता सिद्ध करणेही महत्वाचे असते.आशियात नव्हे तर संपूर्ण जगात चॅम्पियन बनण्याची मनीषा बाळगणाऱ्या त्याला प्रत्येक वळणावर 'सुयश' मिळो याच सदिच्छा !

Web Title: physically disable Suyash Jadhav scored gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.