‘समृद्धी’विरुद्धची याचिका निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 05:18 AM2019-01-30T05:18:57+5:302019-01-30T05:19:37+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून याचिका निकाली

The petition against 'Samrudhi' came out | ‘समृद्धी’विरुद्धची याचिका निकाली

‘समृद्धी’विरुद्धची याचिका निकाली

Next

नागपूर : गरजेपेक्षा जास्त भूसंपादन केले नाही, हे राज्य सरकारने सिद्ध केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी समृद्धी महामार्ग भूसंपादनाविरुद्धची याचिका निकाली काढली.

समृद्धी महामार्ग भूसंपादनासाठी ७ सप्टेंबर, २०१६ रोजी अधिसूचना जारी झाली. त्यानंतर, याचिकाकर्ते व इतरांची जमीन संपादित करण्यात आली. त्याला याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेत, सरकारने गरजेपेक्षा जास्त जमीन संपादित केल्याचे म्हटले होते. त्यांनी जमिनीच्या संयुक्त मोजणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता, परंतु दिलासा न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. सरकारपक्षाने शेतकºयांना नवीन कायद्यानुसार मोबदला देण्यात आल्याचे या वेळी सांगितले.

Web Title: The petition against 'Samrudhi' came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.