रेल्वेकडून प्रवाशांची सुरक्षा वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:59 AM2017-12-10T03:59:01+5:302017-12-10T03:59:15+5:30

केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाºया या दोन्ही यंत्रणांकडून प्रवाशांच्या सुरक्षेची फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे जुईनगर व सानपाडासारखी इतरही स्थानके जुगारींसह गर्दुल्ले व तृतीयपंथींचा अड्डा बनली आहेत. रात्रीच्या वेळी नशा करून ते रेल्वेत गुन्हेगारी कारवाया करत असतात. अशा वेळी महिला डब्यात पोलीस नेमलेले असतानाही त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत.

 On passenger safety of passenger trains | रेल्वेकडून प्रवाशांची सुरक्षा वा-यावर

रेल्वेकडून प्रवाशांची सुरक्षा वा-यावर

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे
 
रेल्वेमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना प्रवाशांच्या जिवावर बेतत आहेत. लोकलने प्रवास करणाºया चाकरमान्यांना डब्यात चढताना अथवा उतरताना किंवा स्थानकातील गर्दीतून वाट काढताना रोज नवनवीन प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच लुटीच्या उद्देशाने होणारे हल्ले प्रवाशांच्या जिवावर बेतत असून, अशा घटनांमध्ये गुन्हेगारांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे; परंतु सुरक्षेच्या बाबतीत कुचकामी ठरलेल्या रेल्वे प्रशासनाचे त्याकडे लक्ष जाईल का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. प्रवासाचे सर्वांत मोठे जाळे व्यापणारी लोकल मुंबईची नस मानली जाते. वेळ व पैशांच्या बचतीसाठी कामानिमित्ताने रोजचा लोकल प्रवास करणाºयांची संख्या लाखोंच्या घरात आहे; परंतु हाच रेल्वेप्रवास या ना त्या कारणाने अनेकांना त्रासदायक ठरत आहे. रेल्वे स्थानक व भोवतालच्या सुविधांच्या अभावामुळे वाढती गुन्हेगारी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतही रेल्वे स्थानकालगतच्या मोकळ्या जागेत अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य उभे आहे. त्या ठिकाणचे तरुण फावल्या वेळेत प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे तरुण स्थानकातील आडोशाच्या जागी, मोकळ्या डब्यात प्रवाशांवर हल्ले करून लुटत आहेत; तर चालत्या लोकलमध्ये लुटीच्या उद्देशाने महिलांवर होणारे हल्ले रोजचेच झाले आहेत. जुईनगर, सानपाडा व इतर स्थानकांमध्ये असे अनेक गुन्हे घडले आहेत. अनेकदा प्रवासी त्यांना प्रतिकारही करतात. मात्र, वेळेवर पोलिसांची मदत मिळत नसल्याने हे गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांना ‘शक्ती मिल’सारख्या गँग रेपच्या घटना घडण्याचीच प्रतीक्षा असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मागील आठवड्यात वाशीतील विद्यार्थिनीला चोरट्याने रेल्वेतून ढकलून पळ काढला. या तरुणाची ओळख पटली असली तरीही त्याला अद्याप अटक झालेली नाही. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा तपास जीआरपी आणि आरपीएफ यांच्या श्रेयवादात फसल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे २०१४ साली रत्नागिरी येथून ऐरोली येथील घरी जाणाºया तुषार जाधव या अभियांत्रिकी विद्यार्थ्याची रेल्वेत हत्या झाली होती. कोकण रेल्वेने पनवेलला उतरल्यानंतर तो पहाटेच्या पहिल्या लोकलने ऐरोलीकडे जात होता. या वेळी दोघा लुटारूंनी रेल्वेच्या डब्यात त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून, लुटून पळ काढला होता. यानंतरही प्रवाशांवर हल्ले करून लुटीच्या घटना सुरूच असल्याने जीआरपी व आरपीएफ यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बहुतांश स्थानकांमध्ये सीसीटीव्ही केवळ नावालाच बसवलेले आहेत. काही सीसीटीव्ही बंद असून, जे चालू आहेत ते दर्जामुळे कामचलाऊ ठरत आहेत. तर एखादी दुर्घटना चित्रित होऊनही गुन्हेगारांचा शोध घेण्याकामी ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची सुरक्षा वाºयावर सोडल्याची संतप्त भावना रेल्वे प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

Web Title:  On passenger safety of passenger trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.