बुडी मारून रेती काढणाऱ्यांना लवकरच मिळणार परवाने- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:34 AM2018-10-29T00:34:19+5:302018-10-29T00:34:46+5:30

बुडी मारून रेती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्रांना लवकरच परवाने दिले जातील. यासंदर्भात तातडीने प्रक्रि या सुरू करावी, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी संबंधित विभागाला दिल्या.

Parivartan - Chandrakant Patil will soon get rid of the villagers | बुडी मारून रेती काढणाऱ्यांना लवकरच मिळणार परवाने- चंद्रकांत पाटील

बुडी मारून रेती काढणाऱ्यांना लवकरच मिळणार परवाने- चंद्रकांत पाटील

Next

भिवंडी :बुडी मारून रेती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्रांना लवकरच परवाने दिले जातील. यासंदर्भात तातडीने प्रक्रि या सुरू करावी, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी संबंधित विभागाला दिल्या. या सूचनांमुळे तालुक्यातील काल्हेर ते गायमुख पट्ट्यात पारंपरिक रेती व्यवसाय करणाºया शेकडो भूमिपुत्रांना दिलासा मिळणार आहे.

तालुक्यातील काल्हेरपासून कशेळी ते ठाण्यातील गायमुख खाडीतील क्षेत्र बुडी मारून रेती काढणाºया व्यावसायिकांसाठी राखीव आहे. हा शेतकºयांचा दुय्यम व्यवसाय असल्याने त्यामुळे येथील शेतकºयांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ताम्रपत्र दिले आहे. अनेक वर्षांपासून पारंपरिक कोळी-आगरी व्यावसायिकांकडून रेती व्यवसाय केला जातो.

महसूल विभागाकडून परवाने दिले जात नसल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. पाटील पडघा येथे भूमिपूजनासाठी आले होते. त्यावेळी खासदार पाटील यांनी भूमिपुत्रांची व्यथा मंत्र्यांच्या कानांवर घातली होती.

सर्वेक्षणाच्या सूचना
खासदार पाटील यांच्या उपस्थितीत कशेळी ते गायमुखपर्यंतच्या खाडीचे सर्वेक्षण करावे. त्यानंतर, परवाने देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या.
या बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Parivartan - Chandrakant Patil will soon get rid of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.