‘पद्मावत’ विरोधाचे लोण महाराष्ट्रातही; ठिकठिकाणी तोडफोड, निदर्शने; पोलीस बंदोबस्तात आज प्रदर्शित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 04:05 AM2018-01-25T04:05:03+5:302018-01-25T04:05:17+5:30

बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधातील देशभरातील आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातही पोहोचले असून, बुधवारी अनेक ठिकाणी तोडफोड, निदर्शने झाली. करणी व राजपूत सेनेच्या आंदोलनामुळे गुरुवारी राज्यात पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. बुधवारी मुंबईतील १०० हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत अटक करण्यात आली.

'Padmavat' resistance fight in Maharashtra; Allocations, demonstrations; The police will be displayed today in protest | ‘पद्मावत’ विरोधाचे लोण महाराष्ट्रातही; ठिकठिकाणी तोडफोड, निदर्शने; पोलीस बंदोबस्तात आज प्रदर्शित होणार

‘पद्मावत’ विरोधाचे लोण महाराष्ट्रातही; ठिकठिकाणी तोडफोड, निदर्शने; पोलीस बंदोबस्तात आज प्रदर्शित होणार

Next

मुंबई : बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधातील देशभरातील आंदोलनाचे लोण महाराष्ट्रातही पोहोचले असून, बुधवारी अनेक ठिकाणी तोडफोड, निदर्शने झाली. करणी व राजपूत सेनेच्या आंदोलनामुळे गुरुवारी राज्यात पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. बुधवारी मुंबईतील १०० हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत अटक करण्यात आली.
मुंबईतील १४० स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या दीपिका पदुकोन, शाहिद कपूर, रणवीर सिंह व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवलीत बुधवारी थ्रीडी चित्रपटाचे खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणा-या ३५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यात मंगळवारी मध्यरात्री २५ जणांनी सातारा-मुंबई महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यात १० वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी १५ जणांना अटक केली.
मराठवाड्यात सर्व सिनेमागृहांना पोलिसांनी संरक्षण पुरविले. औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तर बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर येथे निदर्शने झाली. धुळे महामार्गावर रास्ता रोको झाला. नाशिकला गंगापूर धरणावरील जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळले.
मनसेने मारली पलटी-
‘पद्मावत’ला पाठिंबा देतानाच गरज भासल्यास दिग्दर्शक, कलाकारांच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याचे सांगणाºया मनसेने २४ तासांत भूमिका बदलली. मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांचे वक्तव्य पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचा खुलासा पक्षाने केला.
चार राज्यांच्या मल्टिप्लेक्स मालकांचा प्रदर्शनास नकार-
देशभरातील ७५ टक्के मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे प्रतिनिधित्व करणाºया ‘मल्टिप्लेक्स असोसिएसन आॅफ इंडिया’ या संघटनेने संभाव्य हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
संघटनेचे अध्यक्ष दीपक अशर यांनी सांगितले की, या राज्यांमध्ये सुरू झालेला व होऊ शकणारा हिंसाचार पाहता, प्रक्षकांच्या सुरक्षेसाठी
आमचे सदस्य हा चित्रपट त्यांच्या मल्टिप्लेक्समध्ये दाखविणार नाहीत.

Web Title: 'Padmavat' resistance fight in Maharashtra; Allocations, demonstrations; The police will be displayed today in protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.