उस्मानाबादची जागा काँग्रेसकडे? शिवराज पाटील चाकूरकर लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 11:42 PM2019-03-16T23:42:41+5:302019-03-16T23:46:31+5:30

राष्ट्रवादीकडे असलेली उस्मानाबादची जागा काँग्रेस मागण्याच्या तयारीत असून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. ​​​​​​​

Osmanabad seat to Congress? The possibility of Shivraj Patil Chakrabur to fight | उस्मानाबादची जागा काँग्रेसकडे? शिवराज पाटील चाकूरकर लढण्याची शक्यता

उस्मानाबादची जागा काँग्रेसकडे? शिवराज पाटील चाकूरकर लढण्याची शक्यता

उस्मानाबाद - राष्ट्रवादीकडे असलेली उस्मानाबादची जागा काँग्रेस मागण्याच्या तयारीत असून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील किंवा त्यांच्या पत्नी जि प उपाध्यक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या नावाचा आग्रह स्थानिक काँग्रेसने धरला आहे. परंतु उस्मानाबादच्या  मोबदल्यात कोणती जागा द्यायची हा तिढा सोडविणे आवश्यक आहे. दरम्यान औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांचे नाव सातत्याने समोर येत आहे, मात्र सद्यस्थितीत औरंगाबादची जागा काँग्रेस सोडण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यावर चर्चा होऊन सहमती झाल्यानंतरच या शक्यता दिसतील.

Web Title: Osmanabad seat to Congress? The possibility of Shivraj Patil Chakrabur to fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.