उस्मानाबादेत पोलिसांनीच लाटले दरोड्याचे पैसे

By Admin | Published: July 5, 2017 04:01 AM2017-07-05T04:01:20+5:302017-07-05T04:01:20+5:30

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गनजीक पडलेल्या दरोड्यातील आरोपींच्या मागावर गेलेल्या पोलीस पथकातील फौजदारासह चौघांनी स्वत:चे

In Osmanabad, the robbery robbed the police only | उस्मानाबादेत पोलिसांनीच लाटले दरोड्याचे पैसे

उस्मानाबादेत पोलिसांनीच लाटले दरोड्याचे पैसे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद / नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गनजीक पडलेल्या दरोड्यातील आरोपींच्या मागावर गेलेल्या पोलीस पथकातील फौजदारासह चौघांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक अनिल किरवाडे, पोलीस मनोज भिसे, पोकॉ नरसिंग दिघोळे, राजू चव्हाण या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून दरोड्यातील ४३ लाख ७७ हजारांची रक्कम चव्हाणच्या घरातून हस्तगत करण्यात आली आहे़
तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी पाटीजवळ १९ जून रोजी मध्यरात्री जीपमधून आलेल्या दरोडेखोरांनी कार अडवून लूट केली होती. कोट्यवधीची रक्कम चोरी गेल्याची चर्चा असताना फिर्यादीत केवळ ४ लाखांची रोकड चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले होते़ पोलीस उपनिरीक्षक किरवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक संशयित कारचालक सुरेंद्रसिंग नयनसिंग राजपूत याला घेऊन तपास कामानिमित्त कर्नाटकात गेले होते़ मात्र, राजपूतने पोलिसांना चकवा देऊन पळ काढला होता़
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला़ त्यात २५ जून रोजी कर्नाटकातील हॉस्पेट येथून रूपसिंग राजपूत याला ७२ लाख ५० हजारांच्या रोकडेसह जेरबंद करण्यात आले, तर हैदराबाद येथून श्रवणसिंग राजपूत याला जेरबंद केले़

Web Title: In Osmanabad, the robbery robbed the police only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.