सोशल मीडियातून विरोधकांवर शरसंधान; तावडेंची पवारांवर, तर मुंडेंची तावडेंवर टीका

By अतुल कुलकर्णी | Published: March 29, 2019 01:13 AM2019-03-29T01:13:33+5:302019-03-29T01:27:20+5:30

ट्विटटर, फेसबुक या सोशल मीडियावर एकमेकांवर खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे. राजकीय पक्षांनी नेमलेले ‘पगारी ट्रोलर’ आघाडीवर असल्याची माहिती आहे. 

Opinion from social media; On Pandey's Pawar, while criticizing Munde's parents | सोशल मीडियातून विरोधकांवर शरसंधान; तावडेंची पवारांवर, तर मुंडेंची तावडेंवर टीका

सोशल मीडियातून विरोधकांवर शरसंधान; तावडेंची पवारांवर, तर मुंडेंची तावडेंवर टीका

Next

मुंबई : ट्विटटर, फेसबुक या सोशल मीडियावर एकमेकांवर खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे. राजकीय पक्षांनी नेमलेले ‘पगारी ट्रोलर’ आघाडीवर असल्याची माहिती आहे. 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र बनविण्याची घोषणा २०१२ मध्येच कशी झाली होती व इस्रोच्या उभारणीत आधीच्या सरकारांची काय भूमिका होती हे मांडले.
वैज्ञानिकांनी याची चाचणी करू नये असे सल्ले दिल्यामुळे ती केली गेली नाही, असेही त्यांनी त्यात नमूद केले; मात्र नेटकऱ्यांनी त्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे.
तर काहींनी अशा पगारी पोपटांना घाबरू नका, असे सांगत चव्हाणांची पाठराखणही केली आहे. एकूणात या निवडणुका रस्त्यावर कमी व सोशल मीडियात जास्ती लढल्या जात आहेत.

एक नातू म्हणाला, आजोबा आजोबा, निवडणुका तुम्ही लढवा, दुसरा म्हणाला, आजोबा, मीच पार्थ, मीच लढणार, आजोबांना होती तार्इंची काळजी, दादांना पोरांची, जाणते आजोबा, नातवंडासमोर मुके, मुके, मुके... आजोबांच्या डोळ्यांसमोर धुके, धुके, धुके...
- आशिष शेलार,
मुंबई भाजपाध्यक्ष

काय त्या भाजपा मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रीपद दिलं जाय ना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातले कवी आठवले.
- धनंजय मुंडे,
विरोधी पक्षनेते,
विधान परिषद.

Web Title: Opinion from social media; On Pandey's Pawar, while criticizing Munde's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.