कांदा, टोमॅटोची घसरण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:01 PM2018-10-10T12:01:08+5:302018-10-10T12:01:27+5:30

फळे,भाजीपाला : पुणे येथे गेल्या काही दिवसांपासून कांदा, टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण कायम आहे.

Onion and tomatoes continued to fall | कांदा, टोमॅटोची घसरण कायम

कांदा, टोमॅटोची घसरण कायम

Next

पुणे येथे गेल्या काही दिवसांपासून कांदा, टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण कायम आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. पावसाने ओढ दिल्याने पालेभाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली.  

मंगळवारी कांद्याचे प्रतिक्विंटल दर ६०० ते १३००, बटाटा १३०० ते १८००, लसूण ८०० ते २६०० आणि ३ ते ६ हजार ६०० एवढे होते. गेल्या आठवड्यात अद्रकचे प्रतिक्विंटलचे दर २००० ते ५ हजार ८०० होते. मंगळवारी ३ हजार ते ६ हजारपर्यंत दर वाढले. वांगी, कारली, भेंडी, दोडका, हिरवी मिरची, सिमला मिरची आदी भाज्यांचेही दर स्थिर होेते.

पितृपंधरवडा संपल्याने भाज्यांची मागणी कमी झाल्याची माहिती पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत दर वाढणार असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत.
 

Web Title: Onion and tomatoes continued to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.