सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एकास अटक

By admin | Published: August 30, 2015 01:37 AM2015-08-30T01:37:11+5:302015-08-30T01:37:11+5:30

चिकलठाणा येथे प्रियकराबरोबर गप्पा मारत असलेल्या २२ वर्षीय तरु णीवर चार नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी रात्री एका नराधमाला अटक केल्यानंतर

One more arrest in the gang rape case | सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एकास अटक

सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एकास अटक

Next

औरंगाबाद : चिकलठाणा येथे प्रियकराबरोबर गप्पा मारत असलेल्या २२ वर्षीय तरु णीवर चार नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी रात्री एका नराधमाला अटक केल्यानंतर शनिवारी पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या, अन्य दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गुरुवारी रात्री अत्याचाराची घटना घडली. मुंबईतील शक्ती मिलमधील घटनेची पुनरावृत्ती झालेल्या या खळबळजनक प्रकाराची गंभीर दखल घेत ग्रामीण पोलिसांनी तय्यब अली आणि शेख अश्फाक (रा. सुंदरवाडी) यांच्या मुसक्या आवळल्या. पीडित तरुणी व तिचा प्रियकर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरी करतात. दोघांचे परस्परांवर प्रेम असून ते लवकरच लग्न करणार आहेत. गुरुवारी रात्री ते सुंदरवाडी शिवारातील रस्त्यावर फिरण्यासाठी गेले. तेथे मोटारसायकल उभी करून ते गप्पा मारत होते. त्याचवेळी एकाच मोटारसायकलवरून आलेले २० ते २५ वयोगटातील चार नराधम त्यांच्याजवळ येऊन थांबले. युगुल तेथून जाऊ लागताच आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यास चाकूचा धाक दाखवून पकडून ठेवले, तर अन्य दोघांनी बळजबरीने तरुणीला शेतात ओढत नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. घटनेनंतर पीडित तरुणी व तिच्या मित्राने पोलिसांना माहिती दिली.
ग्रामीण गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवीत नराधम तय्यबला शुक्रवारी रात्रीच बेड्या ठोकल्या. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानंतर शनिवारी रात्री मोठ्या शिताफीने पोलिसांनी अश्फाकला अटक केली, असे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे पीडित तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी तिचे समुपदेशन केले. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणी नोकरीला असलेल्या कंपनीतील व्यवस्थापकाला बोलावून त्यांनाही घटनेची माहिती घातली. तरुणी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर तिला दुसऱ्या विभागात काम द्यावे; अथवा दुसऱ्या शाखेत तिची बदली करण्याची सूचना पोलीस अधीक्षकांनी त्यांना केली. (प्रतिनिधी)

Web Title: One more arrest in the gang rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.