ऐन वेळी संस्था तयार, लक्षावधींची देयकेही अदा! नियमबाह्य असतानाही ‘सोलास’वर उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 05:52 AM2018-04-18T05:52:29+5:302018-04-18T05:52:29+5:30

‘कृषी समृद्धी : समन्वयीत कृषी विकास प्रकल्पा’च्या प्रकल्प संचालकपदी असताना गणेश चौधरी यांनी आवश्यकतेनुसार संस्था तयार करून मोठ्या रकमांचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकार लेखापरीक्षण अहवालातून समोर आला आहे.

Once upon a time the organization is ready, pay the millions of payments! Extraction to 'Solas' even if the rule is out of order | ऐन वेळी संस्था तयार, लक्षावधींची देयकेही अदा! नियमबाह्य असतानाही ‘सोलास’वर उधळण

ऐन वेळी संस्था तयार, लक्षावधींची देयकेही अदा! नियमबाह्य असतानाही ‘सोलास’वर उधळण

Next

- गणेश देशमुख

मुंबई : ‘कृषी समृद्धी : समन्वयीत कृषी विकास प्रकल्पा’च्या प्रकल्प संचालकपदी असताना गणेश चौधरी यांनी आवश्यकतेनुसार संस्था तयार करून मोठ्या रकमांचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकार लेखापरीक्षण अहवालातून समोर आला आहे.
जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन चमू (डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजमेंट टीम-डीपीएमटी) आणि कार्यान्वयीन संस्था (इम्पलिमेंटिंग एजन्सी-आयए) यांनी पशुसंवर्धन व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसंबंधी प्रशिक्षणे आणि इतर कार्यासाठी सोलास या संस्थेची निवड केली. विशेष म्हणजे, सोलास संस्थेची स्थापना १७ आॅगस्ट २०१७ रोजी करण्यात आली आणि तात्काळ कामेही बहाल करण्यात आले. नियमानुसार अनुभवी आणि मापदंडांत काटेकोर उतरणाऱ्या संस्थेलाच हे काम देणे बंधनकारक होते. हा नियम धाब्यावर बसवून ऐनवेळी संस्था तयार करून रकमेचा अपहार करण्याचे कौशल्य गणेश चौधरी यांच्या कार्यळात वापरले गेले.
बार्शीटाकळी (अकोला) क्लस्टरच्या पशुसंवर्धन व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी निविदा मागविल्या. त्यानुसार ह्यसोलास अ‍ॅनिमल हजबंडरी अ‍ॅक्टिव्हिटीज फॉर रुरल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडह्ण, लोकहितैशी बहुद्देशीय संस्था, अंडुरा आणि अमृता सेवा प्रतिष्ठान कळंबी (महागाव) या तीन संस्थांनी अर्ज केले. सर्वाधिक कमी दर असल्याचे कारण नमूद करून सोलास या संस्थेला प्रशिक्षणाचे काम दिले गेले. वस्तुत: पशुधन व्यवस्थापन कक्षाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सोलस ही संस्था अपात्र ठरते. तरीही १७ जानेवारी २०१७ रोजी काही लक्ष रुपयांचे देयक अदा करण्यात आले.

पुण्याच्या एलडीओची संस्था
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, सोलास या संस्थेत राज्य शासनाच्या पशुधन विकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले यशवंत
वाघमारे हे संचालक आहेत. वाघमारे हे शासकीय नोकरीत असताना अनेकदा सोलासच्या कामासंबंधाने विदर्भात आले. त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. वाघमारे यांना अशा पद्धतीने काम करण्याची शासनाने परवानगी दिली होती काय? हा प्रश्न अनुत्तरीच आहे.

चौधरींची पत्नी संचालक
ज्या सोलास संस्थेला नियमबाह्य कामे देऊन अपहार करण्यात आला, त्या संस्थेचा स्वागत उद्योग या संस्थेशी सामंजस्य करार आहे.
स्वागत उद्योग या संस्थेत गणेश चौधरी यांच्या पत्नी संचालक आहेत. अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या या क्लृप्तीचाही गंभीरपणे तपास केला जाणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: Once upon a time the organization is ready, pay the millions of payments! Extraction to 'Solas' even if the rule is out of order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.