आता खासगी शिवशाही चालकांना महामंडळाकडून प्रशिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:46 AM2018-11-15T07:46:21+5:302018-11-15T07:46:52+5:30

दोन टप्प्यांत आयोजन : सुमारे २५० अपघातांनंतर एसटीकडून उपाययोजनांवर भर; वळण घेताना करावा लागतो अडचणींचा सामाना

Now the private Shivshahi drivers are trained by the corporation! | आता खासगी शिवशाही चालकांना महामंडळाकडून प्रशिक्षण!

आता खासगी शिवशाही चालकांना महामंडळाकडून प्रशिक्षण!

Next

महेश चेमटे 

मुंबई : एसटीची आधुनिक ओळख म्हणून महामंडळात दाखल झालेली शिवशाहीअपघातांच्या सत्रात अडकली आहे. शिवशाहीचेअपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाने चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या शिवशाहीच्या अपघातांचा आलेख हा चढाच आहे. शिवशाहीवरील अपघात रोखण्यासाठी महामंडळाकडून उपाययोजनांवर भर देण्यात येत असून २४ विभागांतील सुमारे २ हजार ५०० चालकांसह तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात स्वमालकीच्या शिवशाहीच्या चालकांसह वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण), तांत्रिक पर्यवेक्षक यांना महामंडळाच्या पुणे येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत शिवशाहीबाबत प्रशिक्षण दिले असून दुसºया टप्प्यात खासगी शिवशाहीवरील चालकांना प्रशिक्षण मिळेल. नोव्हेंबर अखेर प्रशिक्षण प्रक्रिया सुरू होणार असल्याचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आर.आर. पाटील यांनी सांगितले.

शिवशाहीच्या बैठ्या आणि शयनयान श्रेणीतील बसची लांबी, उंची यांच्यात साध्या एसटीच्या तुलनेत फरक आहे. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीची बांधणी असल्यामुळे साध्या एसटीच्या तुलनेत शिवशाही चालवताना विशेषत: वळण घेताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्वमालकीच्या एसटी चालकांनी सांगितले. एसटी महामंडळात एकूण २ हजार शिवशाही दाखल होतील. पहिल्या टप्प्यातील १२०० शिवशाहींपैकी सध्या ९७५ शिवशाही राज्यात धावत आहेत. यापैकी ४८० शिवशाही या खासगी कंपन्यांच्या असून यात ६८ शयनयान आणि ४१२ बैठ्या आसनी शिवशाहीचा समावेश आहे. महामंडळाच्या मालकीच्या ४९५ शिवशाही प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहेत. सद्य:स्थितीत एकूण २६० पेक्षा अधिक शिवशाही या अपघातग्रस्त झाल्या आहेत. यापैकी सुमारे २०० अपघात हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

शिवशाहीच्या अपघातांची कारणे
च्चालकाला शिवशाहीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती आणि ते वापरण्याचे प्रशिक्षण नसणे.
च्चालकाला शिवशाहीच्या लांबी व उंचीचा अंदाज नसणे.
च्दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे.
च्रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे.
च्चुकीच्या पद्धतीने वाहनांना ओव्हरटेक करणे.
च्वाहन मागे घेताना रिअर व्ह्यूू कॅमेरा न वापरणे.

असे असेल प्रशिक्षण
च्एकूण ४ बॅचअंतर्गत ६ दिवसांचे प्रशिक्षण.
च्प्रत्येक बॅचमध्ये १ वाहतूक निरीक्षक, ३ ज्येष्ठ चालक, १ सहा. कार्यशाळा अधीक्षक.
च्शिवशाही बांधणी केलेल्या कंपनीतील प्रतिनिधींकडून प्रशिक्षण.
च्शिवशाहीतील तांत्रिक माहिती, वाहनांतील उपलब्ध सुविधा व त्याचा वापर कधी आणि केव्हा करावा, याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शिवशाहीची वैशिष्ट्ये
च्बीएस ४ मानांकनाचे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल असलेले इंजीन.
च्इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल.
च्आपत्कालीन वेळेत ब्रेकसाठी रिटार्डर यंत्रणा.
च्आरामदायी आसने,
वातानुकूलित, सेन्सर आणि सीसीटीव्हीची सोय.
 

Web Title: Now the private Shivshahi drivers are trained by the corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.