आता सर्व हिंदू माझा बंधू! मोहन भागवतांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:33 AM2018-04-16T04:33:21+5:302018-04-16T04:33:21+5:30

भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक

Now all Hindus, my brother! Call of Mohan Bhagwat | आता सर्व हिंदू माझा बंधू! मोहन भागवतांची हाक

आता सर्व हिंदू माझा बंधू! मोहन भागवतांची हाक

googlenewsNext

- शौकत शेख
डहाणू  - भारतातील मुसलमानांनी मंदिरे तोडली नाहीत, ते काम बाहेरच्या मुसलमानांनी केले. आमच्या देशातील तोडलेली मंदिरे चांगली करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगत, तसेच राममंदिरच्या विषयाला स्पर्श करत ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी हाक राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिली.
विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त रविवार, १५ एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन डहाणूतील आसवे येथे दुपारी करण्यात आले होते. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंदन जिंदाल, पालघर जिल्हा अध्यक्ष राजकुमार नागशेट हे या वेळी उपस्थित होते. या वेळी सवितानंदजी महाराज, तुंगारेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद महाराज, त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज, प्रशांत हरतलकर, अशोक चौगुले यांचे स्वागत आदिवासी पेंटिंग व पुष्प देऊन करण्यात आले.
सरसंघचालकांच्या हस्ते आदिवासींच्या हिरवादेवाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला प्रारंभ झाला. मार्गदर्शन करताना सरसंघचालक म्हणाले की, हिंदूंना संमेलन भरवून सांगावे लागते, ही चांगली गोष्ट नाही. आपण हिंदू आहोत, आपण कुणालाही परके मानत नसून, द्वेष करत नाही. जागतिक कल्याणासाठी हिंदू हे जंक्शन आहे. स्वार्थाकरिता काहीजण हिंदूंमध्ये भेद करत आहेत. रामसेतू तुटला, तर काय फरक पडतो, राममंदिराची गरज काय? हे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.
‘वनजन गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी भागवत यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर, मोखाडा येथील वैदू भगत ज्ञानाला सार्वजनिक रूप देणारे नवसुदादा वळवी, चित्रांमधून हिंदुत्व टिकविणारे तलासरीचे हरेश्वर वनगा, वयम संस्थेचे कार्यकर्ते विनायक थाळकर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

देशासाठी वेळ द्या
आदिवासी कधीच कोणालाही शरण गेलेला नाही. सनातन वैदिक संस्कृती व धर्म जपण्याचे कार्य या समाजाने केले आहे. जगाची नाडी, भारताकडे आहे. आपल्या देशासाठी वेळ द्या. बुद्धी, शरीर आणि कुटुंबाचा संसार नीट ठेवल्यास देश सुरिक्षत राहील. जातपात, भाषाप्रांत न मानता ‘सर्व हिंदू माझा बंधू’ अशी सवय लावा, असे भागवत म्हणाले. सामाजिक सेवा करा, असे आवाहन करताना ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे’, या विंदांच्या कवितेचा दाखला त्यांनी दिला.

Web Title: Now all Hindus, my brother! Call of Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.