दंगलीमागे रा.स्व. संघाचा हात, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:23 AM2018-01-13T01:23:18+5:302018-01-13T01:23:31+5:30

भाजपा हा भाजप हा गद्दारांचा, देशद्रोही व्यक्तींचा पक्ष असून कोरेगाव भीमाची दंगल भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनीच घडविली, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

North of riot The Sangh's hand, Arvind Kejariwal's allegation | दंगलीमागे रा.स्व. संघाचा हात, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

दंगलीमागे रा.स्व. संघाचा हात, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

googlenewsNext

सिंदखेडराजा ( बुलडाणा ) : भाजपा हा भाजप हा गद्दारांचा, देशद्रोही व्यक्तींचा पक्ष असून कोरेगाव भीमाची दंगल भाजपा व राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनीच घडविली, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ४२० व्या जन्मोत्सवानिमित्त आम आदमी पक्षाच्यावतीने सिंदखेडराजा येथे आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुधीर सावंत व त्यांच्या सहकाºयांनी यावेळी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला. केंद्र व राज्य सरकारवर केजरीवाल यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, जात, धर्माच्या आधारावर समाजात दुही माजवून राज्य करणे, हाच भाजपाचा अजेंडा आहे. जातीयवादी राजकारणामुळे आज महाराष्ट्राचे नुकसान होत आहे.
तीन वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तेथे शाळांचा कायापालट आम्ही केला असून, ३०० नवीन शाळा निर्माण केल्या आहेत. अन्य शाळांच्या तुलनेत १० टक्के निकालही या सुविधांमुळे वाढला आहे. खºया अर्थाने आम आदमी पक्षाच्या
दिल्ली सरकारने माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण केले असल्याचा दावा त्यांनी केला. ४० हजार कोटींचे बजेट दिल्ली सरकारचे आहे. ते जर सरकारी शाळा चालवू शकते, तर ३ लाख कोटींचे बजेट असलेल्या महाराष्ट्राला सरकारी शाळा चालविणे का जमू नये, असा सवालही केजरीवाल यांनी केला.

सूर्योदयासमयी जिजाऊंना अभिवादन
राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ४२० व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता राजवाड्यामध्ये जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोगरे, वंदना घोगरे, जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापक सुभाष कोल्हे, अर्चना कोल्हे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, उपाध्यक्ष सीमा शेवाळे यांनी जिजाऊंना अभिवादन केले. यावेळी जाधव कुळाचे वंशज गणेश राजे जाधव, राजूकाका राजे जाधव, शिवाजी राजे जाधव, विजय राजे जाधव यांनी सहपरिवार महापूजा केली.

Web Title: North of riot The Sangh's hand, Arvind Kejariwal's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.