...तर पायताण हातात घ्यावे लागेल - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:56 AM2019-05-01T02:56:09+5:302019-05-01T02:56:37+5:30

सरकारला दिला इशारा : सांगोल्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

... need to take care of it - Sharad Pawar | ...तर पायताण हातात घ्यावे लागेल - शरद पवार

...तर पायताण हातात घ्यावे लागेल - शरद पवार

googlenewsNext

सोलापूर : दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे, पण निर्णय घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आता यानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास सरकारविरूद्ध पायताण हातात घ्यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे बोलताना दिला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यावर शरद पवार हे दुष्काळी भागातील पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते. सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर अजनाळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यातील फडणवीस व केंद्रातील मोदी सरकारावर सडकून टीका केली. आघाडी सरकार असताना दुष्काळी भागातील शेतकºयांच्या फळबागा जगविण्यासाठी मदत केली जात होती. यामुळे अजनाळे सारख्या दुष्काळी भागातील शेतकरी डाळींब निर्यात करीत होते. शासनाच्या मदतीमुळे येथील शेतकरी रडत न बसता दुष्काळी स्थितीवर मात करू शकला. कमी पाण्यात डाळींबाचे उत्पन्न घेणाºया या शेतकºयांच्या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आता तीव्र दुष्काळामुळे या परिसरातील डाळींब बागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. या बागा जगाव्यात म्हणून टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी अनुदान द्यावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, यावेळी उपस्थित होते.

Web Title: ... need to take care of it - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.