सर्वाधिक कोटय़धीश राष्ट्रवादी काँग्रेसचे!

By admin | Published: October 12, 2014 02:36 AM2014-10-12T02:36:47+5:302014-10-12T02:36:47+5:30

विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकूण 2,336 उमेदवारांपैकी 1,क्95 म्हणजे 47 टक्के उमेदवारांनी प्रत्येकी एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे.

NCP is the highest betrayer! | सर्वाधिक कोटय़धीश राष्ट्रवादी काँग्रेसचे!

सर्वाधिक कोटय़धीश राष्ट्रवादी काँग्रेसचे!

Next
>विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकूण 2,336 उमेदवारांपैकी 1,क्95  म्हणजे 47 टक्के उमेदवारांनी प्रत्येकी एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईटस’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने, उमेदवारांनी दाखल केलेल्या मालमत्ताविषयक प्रतिज्ञापत्रंचे विश्लेषण करून ही माहिती दिली आहे. 
 
सर्वाधिक श्रीमंत उमेदवार 
च्मोहित कुंभोज (दिंडोशी, भाजपा)-353 कोटी रु.
च्डॉ. नंदकुमार तासगावकर (फलटण, शिवसेना)-211 कोटी रु.
च्मंगल प्रभात लोढा (मलबार हिल, भाजपा)-198 कोटी रु.
च्अबु असीम आझमी (मानखुर्द शिवाजीनगर, सपा)- 156 कोटी रु.
च्प्रसाद मिनेश लाड (शीव कोळीवाडा, राष्ट्रवादी काँग्रेस)-126 कोटी रु.
च्जगदीश मुळुक (वडगाव शेरी, भाजपा)-1क्4 कोटी रु.
च्हितेंद्र ठाकूर (वसई, बहुजन विकास आघाडी)-1क्क् कोटी रु.
च् विनय जैन (मालाड-प., शिवसेना)-93 कोटी रु.
च्हिकमत उधान (घनसावंगी, शिवसेना)-92 कोटी रु.
 
14 उमेदवार कफल्लक!
एकीकडे बहुतेक सर्वच पक्षांनी कोटय़धीश उमेदवार मैदानात उतरविले असताना राज्यभरातील तब्बल 14 उमेदवारांनी आपली मालमत्ता ‘शून्य’ असल्याची प्रतिज्ञापत्रे केली आहेत. 
 
सर्वाधिक कजर्बाजारी उमेदवार
मोहित कुंभोज(दिंडोशी, भाजपा)-316 कोटी रु. मंगल प्रभात लोढा (मलबार हिल, भाजपा)- 91 कोटी रु. बाबासाहेब पाटील (अहमदपूर, राष्ट्रवादी)-75 कोटी रु. रमेशसिंग ठाकूर (कांदिवली-पू., काँग्रेस)- 59 कोटी रु. प्रसाद लाड (शीव कोळीवाडा, राष्ट्रवादी)-57 कोटी रु. अजिंक्य पाटील ( कराड दक्षिण, शिवसेना)- 46 कोटी रु. रवींद्र फाटक (ठाणो, शिवसेना)-41 कोटी रु. नारायण राणो (कुडाळ, काँग्रेस)-34 कोटी रु. राजेंद्र मिरगणो ( बार्शी, भाजपा)-25 कोटी रु.
 
भाजपाचा उमेदवार सर्वाधिक श्रीमंत
निवडणूक लढविणा:या उमेदवारांच्या सरासरी मालमत्तांच्या दृष्टीने विचार केल्यास भारतीय जनता पार्टी हा सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांचा पक्ष असल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते. भाजपा उमेदवारांची सरासरी मालमत्ता 1क् कोटींहून थोडी अधिक आहे. या तुलनेत अपक्ष व इतर उमेदवारांची सरासरी मालमत्ता सर्वात कमी म्हणजे एक कोटी रुपयांच्या घरात आहे.
 
सरासरी मालमत्तेच्या निकषावर उमेदवारांची पक्षनिहाय क्रमवारी अशी 
भाजपा-1क्.33 कोटी रु. शिवसेना-7.82 कोटी रु. राष्ट्रवादी काँग्रेस-7.25 कोटी रु. काँग्रेस-7.1क् कोटी रु. मनसे-2.83 कोटी रु. अपक्ष-1.34 कोटी रु. इतर-1.32 कोटी रु.
 
एक-दोन हजारी उमेदवार
सर्वात कमी म्हणजे एक ते दोन हजार रुपयांची मालमत्ता जाहीर करणा:या पहिल्या 1क् उमेदवारांमध्ये सहा अपक्षांखेरीज आंबेडकर पार्टी, मनसे, फॉॅरवर्ड ब्लॉक आणि बहुजन मुक्ती पार्टी यांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.  हे एक-दोन हजारी उमेदवार असे- सतीश भंडारे (शिरोळ, अपक्ष) 822 रु., प्रमोद सुखदेवे (भंडारा, आंबेडकर पार्टी) 1,क्क्क्रु., ज्ञानेश्वर कुरिल ( बदनापूर,अपक्ष) 1,क्क्क् रु., विकास रोकडे (धारावी, अपक्ष), 1,क्क्क् रु., अजित मोडेकर ( कागल, मनसे) 1,क्क्क् रु., निलेश शेलार ( पाचोरा, बहुजन मुक्ती) 1,1क्क् रु., अंबादास खडसे ( करंजा, फॉरवर्ड ब्लॉक) 1,38क् रु., विश्वासराव घस्टे (इस्लामपूर, अपक्ष), 1,429 रु., संजय सकपाळ ( दिंडोशी, अपक्ष) 2,क्क्क् आणि यासिन शेख ( मलबार हिल, अपक्ष) 2,क्5क् रु.
 
हे उमेदवार असे : युवराज पाटील (अमळनेर, अपक्ष), मो. सलीम अब्दुल करीम (बाळापूर, सपा), योगेश कोरडे (सावनेर, अपक्ष), अशोख उमठे (नागपूर मध्य, अपक्ष), चंद्रकांत ठाणोकर (देगलूर, अपक्ष), आनंदा पाटोळे ( परतूर, अपक्ष), गौतम आमराव ( औरंगाबाद-प., मनसे), विलास रणपिसे ( पैठण, अपक्ष), युवराज अहिरे ( मागठाणो, प्रबुद्ध रिप.), निलेश पाटील (मुलुंड, बसपा), अप्पाराव गालफडे ( विलेपार्ले, अपक्ष), जयंत वाघमारे (घाटकोपर-प., अपक्ष), शेख अब्दुलरहीम (वांद्रे-प., अपक्ष) आणि संजय नकटे (कुलाबा, बसपा).

Web Title: NCP is the highest betrayer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.