नक्षल उपकमांडर महिलेचे गडचिरोलीत आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 05:02 PM2018-05-02T17:02:49+5:302018-05-02T17:02:49+5:30

तेलंगणात कार्यरत असलेल्या मंगी दलमची उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६ वर्ष) या जहाल महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. 

Naxal subcommander woman surrenders in Gadchiroli | नक्षल उपकमांडर महिलेचे गडचिरोलीत आत्मसमर्पण

नक्षल उपकमांडर महिलेचे गडचिरोलीत आत्मसमर्पण

Next

 गडचिरोली - तेलंगणात कार्यरत असलेल्या मंगी दलमची उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६ वर्ष) या जहाल महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. 

महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे तिला विविध प्रकारचा लाभ दिला जाणार आहे. छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्याच्या भोपालपट्टनम येथील मूळची रहिवासी असलेली ज्योती नोव्हेंबर २००९ मध्ये नक्षल्यांच्या भोपालपट्टनम दलममध्ये भरती झाली होती. तेव्हापासून अनेक नक्षली कारवायांत तिचा सक्रिय सहभाग होता. तेलंगणा भागात कार्यरत मंगी दलममध्ये ती आतापर्यंत उपकमांडर म्हणून कार्यरत होती.  मात्र महाराष्टÑ शासनाने नक्षल चळवळीपासून दूर होणाºयांना पुढील जीवन चांगले जगता यावे यासाठी आत्मसमर्पण योजनेतून विविध प्रकारचे लाभ देणे सुरू केल्याने नक्षल नेते व चळवळीचे सदस्य पोलिसांना शरण येत आहेत. भूखंड, आर्थिक मदत, रोजगार, नसबंदी पुन्हा उघडणे यासारख्या माध्यमातून आत्मसमर्पितांचे पुनर्वसन घडवून आणल्या जात  असल्याने सन २०१८ च्या चार महिन्यात ९ माओवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले आहे. इतरांनीही हिंसक मार्ग सोडून मूळ प्रवाहात परत यावे व आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी केले आहे.

मोठ्या नेत्यांवर लाखोंची बक्षीसे
सध्या गडचिरोली पोलिसांना लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या नक्षल्यांच्या पाच मोठ्या नेत्यांचा शोध घ्यायचा आहे. त्यात मलोजुला रेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू उर्फ विवेक उर्फ लक्ष्मीनारायण उर्फ लच्छन्ना अभय याच्यावर ६० लाख रुपयांचे, दीपक उर्फ मिलिंद उर्फ प्रवीण उर्फ अरुण उर्फ सुधीर उर्फ सह्याद्री तेलतुंबडे याच्यावर ५० लाखांचे, नर्मदाक्का उर्फ अल्लुरी उषारानी किरणकुमार हिच्यावर २५ लाखांचे, याशिवाय जोगन्ना उर्फ घिसु ऊर्फ चिमाला नरसय्या याच्यावर २० लाखांचे तर पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपू सुलतान उर्फ कुमारसाय कतलामी उर्फ बाबुराव तोफा याच्यावर १६  लाख रुपयांचे बक्षीस आहे. गुप्त माहितीच्या आधारे त्यांना अटक झाली किंवा ते जीवानिशी मारले गेले तर त्यांच्यावर घोषित बक्षीस माहिती देणाºयास दिले जाईल व नावही गुप्त ठेवले जाईल, असे जाहीर आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Naxal subcommander woman surrenders in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.