नंदूरबारच्या उपमुख्य कार्यकारी अधिका-याच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 08:34 PM2017-11-28T20:34:00+5:302017-11-28T20:38:07+5:30

nashik,Nandurbar,deputy,chief,executive,officer,son,suicide | नंदूरबारच्या उपमुख्य कार्यकारी अधिका-याच्या मुलाची आत्महत्या

नंदूरबारच्या उपमुख्य कार्यकारी अधिका-याच्या मुलाची आत्महत्या

Next
ठळक मुद्दे गळफास घेऊन आत्महत्या ; गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद

नाशिक : नंदूरबार येथील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिका-याच्या वीस वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२८) दुपारी घडली़ अद्वैत मनिष सांगळे (रा़ परिषद भवन, कॉलेजरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजरोड परिसरातील शासकीय वसाहतीमध्ये अद्वैत सांगळे राहत होता़ दुपारी दोन वाजेच्या त्याने राहत्या घरातील स्टोअर रूममध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला़ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अद्वैत यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासून मयत घोषीत केले़ दरम्यान अद्वैतची आई विवाहानिमित्ताने बाहेर गेली होती तर त्याचे वडील मनिष सांगळे हे नंदूरबार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी या पदावर कार्यरत आहेत़
दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: nashik,Nandurbar,deputy,chief,executive,officer,son,suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.