युवक खून प्रकरणी बांधकाम विभागातील कर्मचा-यास पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:52 PM2017-12-04T16:52:14+5:302017-12-04T16:57:37+5:30

 nashik,ingatpuri,murder,accused,Five,years,conviction | युवक खून प्रकरणी बांधकाम विभागातील कर्मचा-यास पाच वर्षे सक्तमजुरी

युवक खून प्रकरणी बांधकाम विभागातील कर्मचा-यास पाच वर्षे सक्तमजुरी

Next
ठळक मुद्देइगतपुरी येथील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी गुप्तागांवर मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू

नाशिक : वडीलांच्या सेवानिवृत्तीच्या कागदपत्रे तयार करण्यासाठी मागीतलेल्या दोन लाख रुपयांचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणभूत ठरलेला सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी पुनाजी वाळू मेंगाळ (५५, राख़ेड, ता़इगतपुरी, जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी सोमवारी (दि़४) पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ३ जून २०१५ रोजी ही घटना घडली होती़
इगतपुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मुरलीधर धोंडू आगविले व आरोपी पुनाजी मेंगाळ हे कामास आहेत़ मेंगाळ याने आगविले यांच्याकडे सेवानिवृत्तीनंतरची पेन्शनची कागदपत्रे तयार करण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची मागणी केली होती़ आगविले यांनी ही बाब मुलगा राजू यास सांगितली असता ३ जून २०१४ रोजी तो मेंगाळ यांच्याकडे गेला कशाबद्दल पैसे द्यायचा याचा जाब विचारू लागला़ यावेळी मद्याच्या नशेत असलेल्या मेंगाळ याने राजूच्या गुप्तागांवर लाथ मारल्याने राजूचा मृत्यू झाला़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधन व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील संजयपाटील व गायत्री पटनाला यांनी साक्षीदार तपासले़ तर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश वारे यांची साक्ष महत्वाची ठरली़ घटनेच्या वेळी आरोपी मेंगाळ हा मद्याच्या नशेत असला तरी कोणत्या ठिकाणी लाथ मारल्यानंतर जीव जाऊ शकतो याचे त्याला ज्ञान होते असे निरीक्षण न्यायाधीश मोरे यांच्या सरकारी वकीलांनी लक्षात आणून दिले़ त्यामुळे आरोपीस मेंगाळ यास पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

Web Title:  nashik,ingatpuri,murder,accused,Five,years,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.