नाशकात भटक्या कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात सिडकोतील तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:06 PM2017-11-29T17:06:56+5:302017-11-29T17:09:17+5:30

nashik,dog,problem,accident,cidco,youth,death | नाशकात भटक्या कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात सिडकोतील तरुणाचा मृत्यू

नाशकात भटक्या कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात सिडकोतील तरुणाचा मृत्यू

Next

नाशिक : शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांमुळे होणाºया अपघातांमध्ये वाढ झाली असून कुत्रे आडवे गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या रिक्षा अपघातात एका तीस वर्षीय तरुणास जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि़२८) सिडकोत घडली़ श्याम बलदेव गवई (रा़३०, रायगड चौक, पवननगर सिडको) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्याम गवई हा मंगळवारी सिडको परिसरातून रिक्षाने प्रवास करीत होता़ या रिक्षाला अचानक भटके कुत्रे आडवे गेल्याने रिक्षाचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व रिक्षा उलटली़ या अपघातात गवई याचे डोके व शरीराला जबर मार लागल्याने त्यास तत्काळ आडगावच्या डॉ़वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ अपघातात प्रकृती गंभीर झालेल्या गवईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याचा मृत्यू झाला़
वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़संजय मानकर यांनी या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्यास कळविली़ दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, अपघातास निमंत्रण ठरणाºया या भटक्या कुत्र्यांचा लवकराव लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

भटक्या कुत्र्यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ


नाशिक शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून महापालिकेकडून केली जाणारी नसबंदी ही केवळ फार्स ठरते आहे़ कुत्र्यांच्या वाढत्या संख्येस आळा घालण्यासाठी लाखो रुपयांचा ठेका दिला जात असून ठेकेदार नेमका करतो काय असा प्रश्न नागरिक विचारता आहेत़ दरम्यान, रात्रीच्या वेळी झुंडीच्या झुंडीने बसलेले भटके कुत्रे हे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पाठिमागे धावत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळते आहे़

Web Title: nashik,dog,problem,accident,cidco,youth,death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.