नाशिक नरबळी प्रकरणातील अकरा आरोपींना आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 06:49 PM2017-12-05T18:49:55+5:302017-12-05T18:59:13+5:30

nashik,black,magic,murder,eleven,accused,imprisonment | नाशिक नरबळी प्रकरणातील अकरा आरोपींना आजन्म कारावास

नाशिक नरबळी प्रकरणातील अकरा आरोपींना आजन्म कारावास

ठळक मुद्देमहाराष्ट्र जादूटोणा कायद्यान्वये राज्यातील पहिलीच शिक्षा इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष ; लाथांनी तुडवून केले ठार

नाशिक : भुताळीण आहेस या कारणास्तव दोन सख्ख्या बहिणींना लाथांनी तुडवून मारणाºया इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील अकरा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़५) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ आरोपींमध्ये मयत महिलेच्या दोन मुलांचा समावेश असून, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा- २०१३ अन्वये देण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे़
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील रहिवासी बुगीबाई पुनाजी दोरे (टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) व तिची बहीण काशीबाई भिका वीर (मोखाडा) यांची आॅक्टोबर २०१४ मध्ये भुताळीण आहे या कारणास्तव अकरा संशयितांनी लाथांनी तुडवून ठार केले होते़ विशेष म्हणजे यानंतर या दोघींचे मृतदेह डहाळेवाडी येथील एका शेतात पुरण्यात आले होते़ या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांनी न्यायालयासमोर आलेल्या पुुराव्यानुसार आरोपी बच्चीबाई खडके, बुग्गी वीर, लक्ष्मण निरगुडे, नारायण खडके, वामन निरगुडे, किसन निरगुडे, गोविंद मोरे, काशीनाथ दोरे, महादू वीर, हरी निरगुडे, सनीबाई निरगुडे (रा़ टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) या अकरा आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अ‍ॅड़ पौर्णिमा नाईक व दीपशिखा भिडे यांनी या खटल्यात काम पाहिले तर तत्कालीन उपविभागीय अधिकारी सी़ एस़ देवराज यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता़

Web Title: nashik,black,magic,murder,eleven,accused,imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.