नाशिकमध्ये एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 02:44 PM2017-09-22T14:44:10+5:302017-09-22T15:15:07+5:30

nashik,atm,cash,theft | नाशिकमध्ये एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ

नाशिकमध्ये एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ

Next
ठळक मुद्देव्हॅनमधील पैशांची एक लोखंडी पेटी गहाळ भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल कर्मचार्यांची चौकशी अद्याप गुन्हा दाखल नाही

नाशिक : शहरातील एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या कंपनीच्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली .

शहरातील एटीएममध्ये कॅश भरण्याचा ठेका सिक्युर कंपनीकडे आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास या कंपनीची व्हॅन (एमएच १२ केपी ८८३४) मधील कर्मचारी सांगली बँक चौकातील आयसीआयसीआय बँकेत पैसे भरण्यासाठी आले असता व्हॅनमधील पैशांची एक लोखंडी पेटी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी सांगली बँक चौकात येण्यापूर्वी रविवार कारंजा दहिपूल या ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे भरले होते . दरम्यान घटनेची माहिती भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांना कळताच ते पथकासह घटनास्थळी दाखल झाले . 

Web Title: nashik,atm,cash,theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.