नारायण राणेंना निवडणूक चिन्ह मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:39 AM2019-03-01T05:39:45+5:302019-03-01T05:40:24+5:30

शुक्रवारी रंगशारदा सभागृहात कोकणवासीयांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात राजकीय वाटचालीबाबत सविस्तर भाष्य केले जाईल.

Narayan Rane got the election symbol | नारायण राणेंना निवडणूक चिन्ह मिळाले

नारायण राणेंना निवडणूक चिन्ह मिळाले

googlenewsNext

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला बादली हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. बादली या चिन्हावर महाराष्ट्रभर सर्व शक्तीनिशी निवडणुका लढवू, असे राणे यांनी हे चिन्ह मिळाल्यानंतर सांगितले.

शुक्रवारी रंगशारदा सभागृहात कोकणवासीयांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात राजकीय वाटचालीबाबत सविस्तर भाष्य केले जाईल. या मेळाव्यात मुंबईतील कोकणी माणूस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी उपस्थित राहतील, असे ते म्हणाले.


भाजपा-शिवसेना युतीनंतर नारायण राणे यांची राजकीय कोंडी झाली होती. युतीवर टीकेची झोड उठवत राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याचे जाहीर केले होते.

Web Title: Narayan Rane got the election symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.