माझी कृषी योजना : पत हमी निधी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:53 AM2018-10-31T11:53:35+5:302018-10-31T11:54:03+5:30

याची अंमलबजावणी छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघामार्फत व कर्जपुरवठा संस्था/बँकांच्या मदतीने करण्यात येत आहे.

My Agriculture Scheme : Credit Guarantee Fund Scheme | माझी कृषी योजना : पत हमी निधी योजना

माझी कृषी योजना : पत हमी निधी योजना

googlenewsNext

पत हमी निधी योजनेची अंमलबजावणी ही केंद्रीय छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघामार्फत व कर्जपुरवठा संस्था/बँकांच्या मदतीने करण्यात येत आहे. या निधीची उभारणी ही प्रामुख्याने पात्र कर्ज पुरवठादार संस्था किंवा बँकांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना  करावयाच्या तारणमुक्त कर्ज पुरवठ्यामधील जोखीम कमी करण्यासाठी १ कोटी रकमेच्या मर्यादेत पत हमीची सुरक्षा देण्यासाठी करण्यात आली आहे.

यासाठी  कंपनी कायद्याखालील कलमान्वये नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या  या योजनेसाठी पात्र ठरतील. कंपनीच्या ज्ञान किंवा उपविधीमध्ये नमूद  कंपनीने आपले सभासदाकडून उभा केलोल समभाग निधी असणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या वैयक्तिक भागभांडवरल धारकांची संख्या ही ५०० पेक्षा कमी नसावी. शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण भागधारकर सभासदापैकी किमान ३३ टक्के इतके भागधारक हे अत्यल्प, अल्प शेतकरी असावेत. शेतकरी उत्पादन कंपनीची निवडून आलेली व्यवस्थापन समिती असावी.  शेतकरी उत्पादक कंपनीचा  व्यवसाय आराखडा व १८ महिन्यांचे अंदाजपत्रक असावेत.

Web Title: My Agriculture Scheme : Credit Guarantee Fund Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.