माझी कृषी योजना : अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:06 PM2019-01-07T12:06:34+5:302019-01-07T12:07:15+5:30

ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचत गटांसाठी आहे.

My Agriculture Plan: Mini-Tractor on Subsidy Scheme | माझी कृषी योजना : अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना

माझी कृषी योजना : अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना

googlenewsNext

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील अल्पभूधारक शेतकऱ्यांची उन्नती व्हावी म्हणून विविध योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना होय; मात्र ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचत गटांसाठी आहे.

पूर्वी शासनामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वैयक्तिकरीत्या पॉवर टिलर, तसेच मिनी ट्रॅक्टर अनुदानावर दिले जात होते; मात्र ही योजना आता बंद करण्यात आली असून, या घटकांतील स्त्री, पुरुष स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर खरेदी करण्याकरिता अनुदान दिले जाते.

या योजनेंतर्गत लाभार्थी स्वयंसाहाय्यता बचत गटांना अनुज्ञेय किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचे ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता कमाल शासकीय अनुदानापेक्षा (३ लाख १५ हजार अनुदान रक्कम) जास्तीचे अनुदान दिले जात नाही. अगोदर बचत गटांना दहा टक्के रक्कम स्वत: भरावी लागते. ट्रॅक्टर खरेदीनंतर शासनाकडील अनुदान मिळते.

Web Title: My Agriculture Plan: Mini-Tractor on Subsidy Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.