ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात रोहा-दिवा पॅसेंजर उशिरा आल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या रुळावर उतरुन आंदोलन केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा-दिवा पॅसेंजर उशिरा आल्याने संतप्त प्रवाशांनी थेट रुळावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली. तसेच, काही प्रवाशांनी कल्याण गाडी थांबविली. मात्र, घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आंदोलन करणा-या प्रवाशांना बाजूला करत कल्याणला जाणा-या गाडीला स्थानकातून बाहेर काढण्यास मदत केली. दरम्यान, दिवा रेल्वे स्थानकातील संतप्त प्रवाशी अद्यापही रेल्वेच्या रुळावर उतरुन आंदोलन करत असल्याचे दिसून येत आहेत.
या आधीही मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने दिवा स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान दिवा स्थानकात संतप्त प्रवाशांनी दगडफेक आणि जाळपोळ केली होती.