मनसेने सीमारेषेवर जाऊन लढावं - नसीरुद्दीन शहा

By admin | Published: October 22, 2016 12:09 PM2016-10-22T12:09:26+5:302016-10-22T12:26:21+5:30

'मनसेने सीमारेषेवर जाऊन लढावे, आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत', असा हल्लाबोलनसीरुद्दीन यांनी मनसेवर केला आहे.

MNS should fight on the border - Naseeruddin Shah | मनसेने सीमारेषेवर जाऊन लढावं - नसीरुद्दीन शहा

मनसेने सीमारेषेवर जाऊन लढावं - नसीरुद्दीन शहा

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे अखेर दूर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे सिनेमाचा वाद शमला असून कोणत्याही राड्याविना 'ए दिल है मुश्किल' येत्या शुक्रवारी 28 ऑक्टोबरला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. पाकिस्तानी कलाकार 'फवाद खान'च्या सहभागामुळे सिनेमा अडचणीत आला होता. उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेमाला विरोध करत मनसेने आक्रमक भूमिका स्वीकारली होती.

यावरुनच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी मनसेवर हल्लाबोल करत खोचक टीका केली आहे. 'कुठल्याही वादावरुन अभिनेते आणि कलाकारांना सहजरित्या टार्गेट केले जाते. निष्पापांना धमकी देण्याऐवजी मनसेने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) सीमारेषेवर जाऊन लढावे, आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत', असा हल्लाबोल नसीरुद्दीन यांनी मनसेवर केला आहे. 

आणखी बातम्या
यापुढे पाक कलाकारांसोबत काम करणार नाही - बॉलिवूडचा नरमाईचा पवित्रा
'ए दिल...'वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
 
'मी करण जोहरच्या सिनेमांचा चाहता नाही, मात्र कोणतीही चूक नसताना विनाकारण राजकारणात अडकल्यामुळे केवळ करणला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्याचा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहणार आहे', असेही नसीरुद्दीन यांनी सांगितले आहे. तसेच 'करण जोहरने माफी मागण्याचेही काही कारण नव्हते', असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

Web Title: MNS should fight on the border - Naseeruddin Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.