दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ

By Admin | Published: June 29, 2016 05:13 AM2016-06-29T05:13:46+5:302016-06-29T05:13:46+5:30

गाय व म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये, प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

The milk purchase price is two bucks | दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ

दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ

googlenewsNext


मुंबई : शासकीय दूध योजनेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाय व म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये, प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही दूध खरेदी दरवाढ १ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
राज्यातील शासकीय दूध योजनांमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याबाबत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील सद्यस्थितीतील दूधखरेदी दर, उत्पादन खर्च या बाबींचा विचार करून, समितीने केलेल्या दूध दरवाढीच्या शिफारशीला मुख्यमंत्र्यांनी आज मान्यता दिली. शासकीय दूध योजनेमार्फत विक्री करण्यात येणाऱ्या गाय आणि म्हशीच्या दूधविक्री दरातही प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गायीचे दूध ३५ रुपये प्रति लीटर तर म्हशीचे ४४ रुपये प्रति लीटर या दराने विक्री करण्यात येईल. या संदर्भातला शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
>असा असेल खरेदी दर
या निर्णयामुळे गायीच्या दूधखरेदी दरात प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली असून, शासकीय दूध योजनेमध्ये संकलित होणाऱ्या गायीच्या दुधासाठी खरेदी दर आता २० रुपयांवरून २२ रुपये करण्यात आला आहे, तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर आता २९ रुपयांवरून ३१ रुपये झाला आहे.

Web Title: The milk purchase price is two bucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.