मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे काँग्रेसचे षडयंत्र, विनोद तावडेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 07:19 PM2018-11-20T19:19:06+5:302018-11-20T19:19:25+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काँग्रेस षडयंत्र आखत आहे, असा आरोप भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

Maratha Reservation : Vinod Tawade attack on Congress | मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे काँग्रेसचे षडयंत्र, विनोद तावडेंचा आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे काँग्रेसचे षडयंत्र, विनोद तावडेंचा आरोप

मुंबई -  मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काँग्रेस षडयंत्र आखत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीमध्ये मराठा समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करावा, असे विधान केले तर आज मागास वर्ग आयोगाचा अहवाल पटलावर ठेवावा, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेत्यांची ही विधाने विसंगत आहेत, यामधून संभ्रम निर्माण होत आहे, असा आरोप भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

  ''दोन्ही समाजात भांडण लावून देण्याचा व असंतोष निर्माण करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे. अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी करतानाच आरक्षण विरोधक या अहवालाची चिरफाड करुन वकिलांची फौज तयार करायची व मराठा समाजाला न्यायालयात आरक्षणासाठी अडचण निर्माण करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. त्यामुळे आरक्षण देण्यापूर्वीच न्यायालयात जायचे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी भूमिका घेण्याचे निर्देश केंद्रातील हायकमांडने राज्यातील काँग्रेसला दिले असावेत. कारण सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकेल, असा आरोप शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी,''असे आवाहनही  तावडे यांनी केले.

Web Title: Maratha Reservation : Vinod Tawade attack on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.