मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी काढला गाडीवरचा लाल दिवा

By admin | Published: April 19, 2017 05:58 PM2017-04-19T17:58:01+5:302017-04-19T18:00:21+5:30

मंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीचा लाल दिवा 1 मे पासून काढण्यात येणार असल्याचा आज केंद्रीय मंत्रीमंडळाने निर्णय घेतला

Many ministers including the Chief Minister took out the red light on the car | मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी काढला गाडीवरचा लाल दिवा

मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी काढला गाडीवरचा लाल दिवा

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.19 - मंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीचा लाल दिवा 1 मे पासून काढण्यात येणार असल्याचा आज केंद्रीय मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्वागत करून आपल्या गाडीवरचा लाल दिवा तात्काळ वापरण्याचं थांबवलंय. 
 
केंद्रानं लाल दिव्याला तिलांजली दिल्यानंतर राज्यातही हा निर्णय स्वीकारण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच लाल दिवा वापरणं थांबवलं. तर, बावनकुळे  राळेगणसिध्दी येथे जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्यासोबत अवैध दारूबंदी संदर्भातील नियोजित बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी बावनकुळे यांना लाल दिवा काढण्यासंदर्भात केंद्र शासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती समजली आणि बावनकुळे यांनी या निर्णयाचे स्वागत करून आपल्या गाडीवरचा लाल दिवा तात्काळ काढून लाल दिवा नसलेल्या गाडीने प्रवास सुरू केला. त्यांच्यापाठोपाठ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही लाल दिवा काढण्याचे आदेश दिले. त्यामुळं आता राज्यातल्या मंत्र्यांच्या गाड्यांवरही लाल दिवा दिसणार नाही. 
 
याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही तातडीने त्यांच्या गाडीवरील लाल दिवा हटवला. 

Web Title: Many ministers including the Chief Minister took out the red light on the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.